B. D. Chechar Sakal esakal
Ganesh Chaturthi Festival

'बाप्पा चालले आपुल्या गावाला, चैन पडेना आमच्या जीवाला'; गणरायाला निरोप देताना चिमुरड्यांना अश्रू अनावर, मिठी मारली अन्..

शहरासह जिल्ह्यात रात्री दहापर्यंत सुमारे चार लाख मूर्तींचे संकलन झाले.

सकाळ डिजिटल टीम

शहरात पंचगंगा घाटासह रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, राजाराम बंधारा, राजाराम तलाव आदी ठिकाणी महापालिकेने विसर्जन कुंडाची व्यवस्था केली होती.

कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श देत यंदाही कोल्हापूरकरांनी शहरासह जिल्ह्यात पर्यावरणपूरक विसर्जनावर भर दिला. काल (शनिवार) घरगुती गौरी-गणपती विसर्जनाच्या निमित्ताने महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने नेटकी व्यवस्था राबवली.

शहरासह जिल्ह्यात रात्री दहापर्यंत सुमारे चार लाख मूर्तींचे संकलन झाले. दरम्यान, संकलित झालेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती होणार आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे (Panchganga River) पाऊल म्हणून पर्यावरणपूरक विसर्जनाची चळवळ आता लोकांनीच हाती घेतली असून, सर्वत्र स्वयंस्फूर्तीने पर्यावरणपूरक विसर्जन झाले.

दरम्यान, 'बाप्पा चालले आपुल्या गावाला, चैन पडेना आमच्या जीवाला’ अशीच अवस्था शनिवारी घरांघरांतील बालमित्रांची झाली होती. पर्यावरणपूरक विसर्जनानंतर बाप्पाला अखेरचा निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला होता. यावेळी भाविक भावूक झाल्याचं पाहायला मिळतं होतं. शहरात पंचगंगा घाटासह रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, राजाराम बंधारा, राजाराम तलाव आदी ठिकाणी महापालिकेने विसर्जन कुंडाची व्यवस्था केली होती.

या ठिकाणी महापालिकेसह विविध सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून संकलन केले जात होते. शहरातील विविध १८० ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था होती. येथे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी घरीच पर्यावरणपूरक पध्दतीने मूर्तीचे विसर्जन केले.

महापालिकेच्यावतीने सायंकाळी सहापर्यंत तेरा हजार ४७८ मूर्ती, तर रात्री आठपर्यंत ३१ हजार ९२७ मूर्तींचे संकलन झाले होते. रात्री दहापर्यंत एकूण ४० हजार २०० एवढ्या मूर्तींचे संकलन झाले. या सर्व मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित झाल्या. महापालिकेचे पाचशे अधिकारी व कर्मचारी, चार विभागीय कार्यालयातील पाचशे आणि आरोग्य विभागाचे बाराशे कर्मचारी आदींनी ही यंत्रणा राबवली. १५२ टेम्पो, ३७४ हमाल, पाच जेसीबी, सात डंपर, चार ट्रॅक्टर, चार टॅंकर, दोन बूम, पाच रुग्णवाहिका, दहा तराफे अशी ही एकूणच यंत्रणा कार्यरत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT