Ganeshotsav 2025: Hadpakya Ganpati of Nagpur Bhonsle Kings esakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2025: स्वारीवर गेलेल्या भोसल्यांना गणेशोत्सवात यायला जमलं नाही; पितृपक्षात बसवला होता गणपती; जाणून घ्या इतिहास...

Hadpakya Ganpati of Nagpur Bhonsle History : २६७ वर्षांची परंपरा असलेल्या या गणपतीची स्थापना नागपूरचे राजे भोसले यांच्या राजवाड्यामध्ये होते. नवासाला पावणारा गणपती असंही मानलं जातं.

वैष्णवी कारंजकर

Unique Pitrupaksha Ganesh Festival : गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने सध्या सगळं वातावरण भारून गेलेलं आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झालेलं आहे, तसंच सार्वजनिक मंडळांमध्येही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. पुण्यामध्ये मानाच्या गणपतीची जशी अनेक दशकांची परंपरा आहे, त्याचप्रमाणे नागपुरातही अशी परंपरा आहे. पण या अनोख्या गणपतीची स्थापना विसर्जनानंतर होते. २६७ वर्षांची परंपरा असलेल्या या गणपतीची स्थापना नागपूरचे राजे भोसले यांच्या राजवाड्यामध्ये होते. नवासाला पावणारा गणपती असंही मानलं जातं.

काय आहे या गणपतीचा इतिहास?

१७०० च्या दशकामध्ये त्यावेळचे राजे चिमाजी भोसले यांनी बंगालवर विजय मिळवला. त्यानंतर ते नागपूरमध्ये परत आले. पण तोवर गणेशोत्सव संपला होता. चिमाजी भोसले यांनी गणरायाकडे नवस केला होता. हा नवस पूर्ण करायचा होता आणि विजयी जल्लोषही करायचा होता. त्यामुळे चिमाजी भोसले यांनी पुजाऱ्यांना विचारून हडपक्या गणपतीची स्थापना केली.

तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. पितृपक्षातल्या भाद्रपद कृष्ण चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. यामध्ये विजयाचा सोहळा साजरा केला जातो. या उत्सवाच्या काळामध्ये विविध सांस्कृतिक कला सादर केल्या जात असत,नकला, मजा मस्करीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असे, त्यामुळे या गणपतीला मस्कऱ्या गणपती असंही नाव पडलं. तेव्हापासून या गणपतीची परंपरा सुरू आहे. आता काळानुसार या उत्सवामध्ये थोडेफार बदल झाले आहेत.

हा गणेशोत्सव पितृपक्षामध्ये साजरा केला जातो. पितृपक्षालाच वऱ्हाडी भाषेमध्ये हाडोक किंवा हडपक/हडपोक असं म्हटलं जातं. त्यामुळे या गणपतीचं नाव हडपक्या गणपती असं झालं. १७५५ पासून या गणपती उत्सवाची सुरुवात झाली. पूर्वी २१ फुटांची १२ हातांची मूर्ती स्थापन केली जात असे. पण आता २००५ पासून साडेतीन फुटांच्या आणि १२ हातांच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

स्टार प्रवाहच्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून एक- दोन नाही तब्बल ४ जणांची एक्झिट; कारण काय?

No Signal in Lift Reason : तुम्ही लिफ्टमध्ये शिरताच तुमचं मोबाईल नेटवर्क का गायब होतं? याचे कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

SCROLL FOR NEXT