news-stories

कऱ्हाडात जलकुंडांसह संकलन केंद्राला प्रतिसाद; तब्बल तीन हजार मूर्तींचे विसर्जन

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : गणेशोत्सवातील आजच्या पाचव्या दिवशी शहरातील तीन हजार कुटुंबांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. एकही नागरिक कृष्णा व कोयना नदीच्या तीरावर विसर्जनासाठी आला नाही. कोरोनामुळे नदीकाठावर विसर्जनास गर्दी करू नये, असे पोलिसांनी आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. पालिकेच्या फिरत्या मूर्ती संकलन केंद्रास प्रतिसाद मिळाला.
 
नागरिकांनी पालिकेच्या फिरत्या मूर्ती संकलन केंद्राकडे आपल्या मूर्ती दिल्या. काहींनी पालिकेच्या जलकुंडात मूर्ती विसर्जित केल्या. दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर आज (ता. २७) शहरात गौरी विसर्जनासह घरगुती गणेशमूर्तींचेही विसर्जन होते. तब्बल तीन हजार कुटुंबांच्या मूर्तींचे विसर्जन आज होते. त्यासाठी पोलिस व पालिकेने जय्यत तयारी केली होती. दीड दिवसाच्या घरगुती मूर्ती विसर्जनासाठी पालिका व पोलिसांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

पालिकेने 19 जलकुंड बांधले आहेत. त्याच जलकुंडांत बहुतांशी नागरिकांनी मूर्ती विसर्जित केल्या. त्या जलकुंडांलगतही पालिकेने तीन कर्मचारी तैनात केले आहेत. शहरासह त्या लगतच्या उपनगरांतून आलेले नागरिक थेट जलकुंडात मूर्ती विसर्जित करत होते. आज पालिकेने गणेशमूर्ती संकलनासाठी 29 वाहने व त्यासोबत 200 कर्मचारी तैनात होते. फिरते मूर्ती संकलन केंद्र प्रत्येक वॉर्डात फिरून मूर्ती गोळा करत होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT