news-stories

मुस्लिम कुटुंबियांच्या पुढाकाराने कोरोनाबाधित कुटुंबात उत्सवास प्रारंभ

सिद्धार्थ लाटकर

शिरवडे (जि.सातारा) : शिरवडे रेल्वे स्टेशन येथील कोरोनाबाधित परिवारास मुस्लिम बांधवांनी मदत केली. श्री गणेशमूर्ती, प्रसाद, किराणा माल अशा स्वरूपात मदत करून हिंदू- मुस्लिम ऐक्‍याचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. शिरवडे रेल्वे स्टेशनवर एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला. शेजारीच राहणारे मोहसीन संदे यांनी त्यांना किराणा माल आणून दिला. नंतर याच घरात दुसरा रुग्ण सापडला. त्यामुळे या घरातील वातावरणात चिंतेची आणखी भर पडली.

शाहूनगरीत हर्षोल्हासात बाप्पांचं आगमन 

पहिल्या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल रात्री उशिराने मिळाला. हे समजताच मसूर येथील चिनार मेडिकलचे दिलावर सुतार व त्यांचा मुलगा मुबीन यांनी आवश्‍यक औषधोपचाराच्या गोळ्या तब्बल रात्री साडेअकरा वाजता पोच केल्या. दुसऱ्या दिवशी मुबीन व सद्दाम यांनी बाजारपेठेतून बाधित कुटुंबातील तरुणास व्हॉटस्‌ऍपवरून फोटो पाठवून श्रीगणेशमूर्ती ठरवली. लागणारे पूजा साहित्य, मोदकही आणले. जातीय तेढ, आकस आपण कित्येकदा ऐकतो, पाहतो; परंतु हे उदाहरण नक्कीच बेमिसाल ठरेल.

युरियावर अन्य खत मारले जाते माथी!, कृषी सेवा केंद्र बदलले, की बदलतो भाव 
 
शिरवडे स्टेशन येथील जमाल संदे, वासिम संदे, हरुण संदे, शब्बीर संदे, रियाज संदे, इरफान संदे, शौकत संदे, रज्जाक संदे या सर्व मुस्लिम बांधवांनी मदत व विचारपूस करून हिंदू- मुस्लिम ऐक्‍याचे चांगले उदाहरण उभारले. "सकाळ'चे बातमीदार जयंत पाटील व मोहसिन संदे यांनी बाधित कुटुंबास आवश्‍यक वस्तू पुरवून मानसिक आधारही दिला. श्री गणेशाची मूर्ती पोच करताना आनंद वेगळा होता. निसर्गाने एक संधी दिलेली आहे. असाच सलोखा सर्वत्र राहिल्यास वादाचा प्रश्‍नच येणार नाही.

भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT