A simple welcome by devotees of beloved Ganarayaa in pimpri 
news-stories

घरोघरी बाप्पा विराजमान ; लाडक्‍या गणरायाचे भाविकांकडून साधेपणाने स्वागत 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी, : अंगात कुर्ता-पायजमा, डोक्‍यावर टोपी, देवघरातील घंटेचा निनाद आणि मुखाने "गणपती बाप्पाऽ मोरयाऽऽ'चा नामघोष, अशा उत्साह, आनंद व मंगलमय वातावरणात शनिवारी (ता. 22) भाविकांनी लाडक्‍या गणरायाचे स्वागत केले. घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूजा विधी करून मूर्तींची प्रतिष्ठापना केली. दरम्यान, सकाळी पावसाच्या हलक्‍या सरी बरसत असतानाही मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर भाविक दिसत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणपतीचे आगमन व विसर्जनाच्या दिवशी मिरवणुका काढू नयेत, गर्दी करू नये, दोन व्यक्तींमध्ये सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन महापालिका व पोलिस प्रशासनाने केले होते. बहुतांश भक्तांनी काटेकोर पालन करीत गणरायाचे स्वागत केले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे दिसणारा ढोल-ताशांचा गजर, झांजपथकांचे सादरीकरण, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, मंडळांच्या मिरवणुका या वर्षी दिसल्याच नाहीत. बहुतांश मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. काहींनी प्रतिष्ठापनाच केली आहे. मात्र, त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी घरातच मूर्तींची प्रतिष्ठापना केली. 

शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त होता. त्यामुळे सकाळी बरसणाऱ्या रिमझिम पावसात भिजतच भाविकांना विक्रेत्यांकडे जावे लागले. काहींनी शुक्रवारीच गणेश मूर्ती घरात आणून ठेवली होती. मात्र, दरवर्षीचा उत्साह आज दिसला नाही. काही गणेश मंडळांनी देखाव्यांऐवजी रक्तदान शिबिरे, आरोग्य विषयक जनजागृती, प्लाझ्मादान उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. साधेपणाने उत्सव साजरा करण्यावर भर आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेचे आवाहन 
महापालिकेमार्फत नैसर्गिक व सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या विसर्जन घाटांवर मूर्ती विसर्जन करण्यास मनाई आहे. त्यामुळे घाटांवर कोणतीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. नागरिकांनी घरामध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. मात्र, विसर्जन घाट परिसरात आरोग्य विभागातर्फे नियमित साफसफाई केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साधेपणाने गणेशमूर्तींचे विसर्जन पार पाडून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT