Ratnagiri Ganeshotsav Indian Army Jawan Ganpati Decoration esakal
Ganesh Chaturti Festival

Ratnagiri Ganeshotsav : भारतीय सेनेला 'सॅल्यूट' देणारा देखावा; सैनिकांच्या वेशातील साकारला 'बाप्पा'

'ही सर्व देव माणसे आम्हा भारतवासियांसाठी प्रेरणास्थान आहेत.'

- मकरंद पटवर्धन

आपल्या भारताच्या संरक्षण दलामधील वायुदल नौदल व भारतीय सेना (Indian Army) हे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात.

रत्नागिरी : पर्यावरणपूरक गणपती (Ratnagiri Ganeshotsav) व देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कुवारबावच्या उत्कर्षनगरमधील संजय जगन्नाथ वर्तक (Sanjay Vartak) यांनी सलग १५ व्या वर्षी भारतीय सेनेला मानवंदना देणारा पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. या वर्षी वर्तक कुटुंबीयांनी १२ फुटी देखाव्यामध्ये बाप्पा साकारला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

रात्रंदिवस आपल्या प्राणांची तमा न बाळगणाऱ्या सैनिकांना मानवंदना म्हणून सैनिकांच्या वेशातील बाप्पा साकारला आहे. आपल्या भारताच्या संरक्षण दलामधील वायुदल नौदल व भारतीय सेना (Indian Army) हे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात.

आपल्या कुटुंबाचा त्याग करून देशवासीयांना सुखाची झोप मिळावी यासाठी सीमेवर तैनात असणारी हीच ती देव माणसे. ही सर्व देव माणसे आम्हा भारतवासियांसाठी प्रेरणास्थान आहेत. अशा या भारतीय सेनेला अभिवादन करण्याकरिता वर्तक कुटुंबीयांनी देखावा साकारला आहे.

या देखाव्यासाठी पर्यावरणपूरक वस्तू वापरल्या आहेत. यामध्ये पुठ्ठा, कागद, दोरा, पिठाची चिक्की, कापड, टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. रणगाडा साकारला आहे. बुलेट गाडीवर बाप्पा सवार झाले आहेत. बाप्पांचा वेश भारतीय सैनिकांचा आहे. एका भिंतीवर विमान सज्ज आहे. बाप्पाच्या मागे भारताचा नकाशा साकारला असून बाप्पा एका युद्धनौकेवर बसवला आहे.

आम्ही दरवर्षी गणेशोत्सव इको-फ्रेंड्ली व्हावा, यासाठी हा छोटासा प्रयत्न करतो. यापूर्वी आम्ही १० फूट पर्यावरणपूरक मूर्ती साकारली. २०१६ आम्ही ८.५ फूट गणपतीपुळ्याचे मंदिर पुठ्ठे आणि कागद वापरून बनवले होते आणि ७.५ फूट गणपती बाप्पाची मूर्ती वाळू, पुठ्ठा यापासून बनवली. त्याची आभुषणे वडाच्या पारंब्या आणि माडाच्या झावळांपासून बनवली. वाळू शिल्पे वाचवा, मुलगी शिकवा असा संदेश दिला. अन्य लोकांनीही यातून प्रेरणा घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. लहान मुलांवरही याचा संस्कार व्हावा.

- संजय वर्तक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : अपहरण करून खून केल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT