Muslim Community Ganesh Aarti Tambave esakal
Ganesh Chaturthi Festival

Satara Ganeshotsav : कौतुकास्पद! 'या' गावात मुस्लीम बांधवांनी केली गणेशाची आरती; राज्यासमोर ठेवला नवा आदर्श

मुस्लीम समाजाच्या वतीने श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन केले जाते, ही खूप मोठी गोष्ट आहे.

सकाळ डिजिटल टीम

संगम गणेश मंडळाने (Ganesh Mandal) राबविलेला उपक्रम जिल्ह्यालाच नव्हे, तर राज्यासमोर आदर्शवत आहे.

तांबवे : समाजातील सलोखा कायम राहावा, एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होऊन गावागावांतील एकी कायम राहावी, या हेतूने येथील संगम गणेश मंडळाने (Ganesh Mandal) राबविलेला उपक्रम जिल्ह्यालाच नव्हे, तर राज्यासमोर आदर्शवत आहे. त्यातून जातीय सलोखा कायम राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी केले.

येथील संगम गणेश मंडळाच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या वतीने (Muslim Community) श्री गणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. सरपंच शोभाताई शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, विजयाताई पाटील, प्राची देवकर, अथर्व ताटे. डॉ. एम. एन. संदे, शंकर पाटील आदींसह ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, ‘‘पुसेसावळी (Pusesawali Riots) तांबवे गावापासून खूप दूर नाही. ती घटना व्हायरल झाली. अनेक अफवा उठवल्या. मात्र, पोलिसांनी त्या घटनेचे पडसाद कोठेही उमटू दिले नाहीत. येथे मुस्लीम समाजाच्या वतीने श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन केले जाते, ही खूप मोठी गोष्ट आहे. ती जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्यासाठी आदर्शवत आहे.’’ श्री. पाटील, डॉ. संदे यांनी मंडळाच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. अॅड. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत पवार यांनी आभार मानले.

राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

किरपे येथील राष्ट्रीय खेळाडू प्राची देवकर आणि तांबवेतील अथर्व ताटे यांचा पोलिस उपअधीक्षक ठाकूर यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी दोन्ही खेळाडूंनी गावचे नाव राज्यपातळीवर पोचवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT