ganpati 
ganesh-festival

Ganesh Festival : अकोल्यात विघ्नहर्त्याचे आगमन

सकाळवृत्तसेवा

अकाेला : ढाेल, ताशे अन् गुलालाच्या उधळणीत आज विघ्नहर्त्याचे जल्लाेषात आगमण हाेणार आहे. त्यासाठी श्रीराजराजेश्वरनगरी सज्ज झाली आहे. शिवाय, बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सर्वांचे दु:ख हरणाऱ्या विघ्नहर्त्याच्या आगमणाची तयारी पूर्ण झाली आहे.

सकाळपासूनच बाप्पांच्या आगमणाला सुरूवात झाली. त्या अनुषंगाने घराेघरी बाप्पांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. शिवाय, बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ठिकठिकाणी बाप्पांच्या मूर्ती विक्रीचे प्रतिष्ठाने लागली सजली आहेत. सजावट अन् बाप्पांच्या मूर्तीची खरेदी झाली. पण, विघ्नहर्त्याचे विधीवत पूजन अन् प्रतिष्ठापनेचा शुभमुहूर्त काेणता, असा प्रश्न अनेकांच्या मनात असताे. चला तर मग तज्ज्ञांच्या मते या प्रश्नाची उकल करूया आणि जाणून घेऊया बाप्पांचे विधीवत पूजन अन् प्राणप्रतिष्ठापनेची विधी.

संपूर्ण दिवस शुभमुहूर्त
गुरुवार ता. 13 सप्टेंबर शु.चतुर्थीला विघ्नहर्त्याचे आगमन हाेणार आहे. कुळाचाराप्रमाणे दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस श्री गणेशाच्या मृण्मय मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा करावी. श्री गणेश विघ्नहर्ता असल्याने सूर्याेदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण दिवस पूजन आणि प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे.

अशी करा प्राणप्रतिष्ठापना
सर्वप्रथम सुपारीवर गणपतिची पुजा करावी, त्यानंतर कलश पुजन करावे. दिव्याचे पुजन करून 21 वेळा ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा उच्चार करुन मुर्तिची प्राणप्रतिष्ठा करावी. गणपती अथर्व शिर्षाचे पठण करावे. मुर्तिचे शाेडशाेपचार पूजन करावे. गणपतीला आवडणारे जास्वंदाचे फुल आणि शमी पत्रासह विविध पत्री वाहावे. २१ दुर्वांची जुडी वाहावी आणी गुळ खोबऱ्याचा व 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर ‘श्रीं’ची आरती करावी.

श्री गणेश हे विघ्नहर्ता असल्याने त्यांचे पूजन आणि प्राणप्रतिष्ठापनेसाठी संपूर्ण उत्तम आहे. श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केल्यावर गणपतीला प्रार्थना करावी. आम्हा सर्वांना सत्प्रेरणा, सद्‍ विचार, सद्‍ विवेक, सद्‍बुध्दी द्या. सर्वांना दिर्घायुष्य लाभू द्या. सर्वांचे कल्याण करावे..
- मंगेश गुरुजी पारगांवकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT