Sanjay Gawde
Sanjay Gawde sakal media
ganesh-festival

ज्याने मूर्ती घडविण्यास शिकविले, तेच हात सोडून गेले...

कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सव (Ganpati Festival) येण्याच्या दोन ते दीड महिने आधी मूर्तिकारांची (Sculptor) मूर्ती घडविण्याची लगबग सुरू असते. माती जमा करणे, सर्व सामग्री गोळा करून कच्चा मूर्त्या करणे, त्यानंतर त्यांना आकर्षक रंग (beautiful colors) देऊन शेवटचा हात फिरविला जातो. मात्र, याच अचानक दुःखाचा डोंगर कोसळून सर्व काही ठप्प झाले असताना, मनावर दगड ठेवून गणरायाची मूर्ती (Ganpati Idol) तयार करण्याचे कर्तव्य पूर्ण केले. दिवा (Diva) येथे राहणारे संजय गावडे (sanjay Gawde) यांच्या वडिलांचे गणेशोत्सव येण्याच्या 15 दिवस अगोदर निधन झाले. मात्र, दुःख सावरून हातात ब्रश घेऊन गणरायाच्या मुर्त्या घडविल्या.

मागील वर्षीपासून कोरोनाने संकट सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे मागील वर्षी गावडे यांची एकही गणपतीची मूर्ती विकली गेली नाही. परिणामी, आर्थिक सावट त्यांच्यावर पसरले होते. यंदा राज्य सरकारच्या सूचना येण्यास विलंब लागल्याने कामांची सुरुवात करण्यास विलंब झाला. तर, कोरोना काळ असल्याने कोकणातच गावी सर्व कुटूंबीय थांबले होते. संजय गावडे आणि त्यांचे वडील बाळकृष्ण गावडे यांनी शाडूची माती, लालमती गोळा करून सर्व सामग्री तयार करून कच्चा मूर्त्या तयार केल्या. या मुर्त्या घेऊन लालबाग येथील कार्यशाळेत संजय यांनी आणल्या. मात्र, याच दरम्यान वडिलांना हृदय विकारचा झटका येऊन निधन झाले.

संपूर्ण कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मूर्ती घडविण्यात महत्त्वाचे हात सोडून गेले होते. संजय हे अंतिम विधीसाठी कोकणात गेले. मात्र, हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुंबईला आले. काही छोटी-मोठी कामे करून पुन्हा गाव गाठले. कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. पण, गणेश भक्तांनी ऑर्डर केलेल्या मुर्त्या तयार करणे बाकी होते. यावेळी संजय यांच्या जवळच्या मित्रांनी मौलाची मदत केली. मूर्ती रंगवणे, डोळ्यांचे बारकाईने काम केले. जितके शक्य होईल तेवढी मदत मित्रांकडून मिळाली. मनात सर्व भावना दाटून आल्या होत्या. मात्र मित्रांनी खूप हिमंत दिली. नाहीतर एकट्याला हे काम करणे अवघड होेते, असे संजय गावडे यांनी सांगितले.

आतापर्यंत मूर्तीची किंमत कधीही केली जात नव्हती. मात्र, यावर्षी गणेशभक्तांकडून मूर्ती घेण्यासाठी बजेट ठरविण्यात येत होते. मात्र, कोरोना, लोकल बंद असल्याने अनेक गणेश भक्तांच्या ऑर्डर रद्द झाल्या. यंदा फक्त 50 ते 60 टक्के मूर्त्यांची विक्री झाली. तर, काही मूर्तींची खरेदी किंमतीपेक्षा कमी दरात गणेशभक्तांना मुर्त्या दिल्या. त्यामुळे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. अंबरनाथ ते लालबागपर्यंत गणेशभक्त मूर्ती घेण्यासाठी येत होते. मात्र, मागील दोन वर्षे सर्व काही शांतता आहे, असे गावडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT