Shahi Modak Recipe: Sakal
ganesh food recipe

Shahi Modak Recipe: गणरायासाठी सातव्या दिवशी बनवा शाही मोदक, कायम राहील कृपादृष्टी

Shahi Modak Recipe: लाडक्या बाप्पासाठी सातव्या दिवशी शाही मोदक बनवू शकता. हे मोदक बनवणे सोपे असून चवदार देखील आहेत.

Puja Bonkile

गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी बाप्पासाठी शाही मोदक बनवण्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी. नारळ, कंडेन्स मिल्क, बदाम, पिस्ता, काजू आणि वेलची पावडर यांचा वापर करून तयार केलेले हे मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील. बाप्पाला अर्पण केल्यास त्यांची कृपादृष्टी कायम राहील.

Shahi Modak Recipe: सहा दिवसांपुर्वी घरोघरी गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले आहे. आज बाप्पाच्या आगमनला सात दिवस पुर्ण झाले आहेत. सर्व ठिकाणी मंगलमय, उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. गणेश मंडळांची सजावट पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवात सकाळ-संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते. गणरायाला मोदक, जास्वंदाचे लाल फुल आणि दुर्वा खुप प्रिय आहे. या गोष्टी अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात.

बाप्पाला रोज वेगवेगळ्या चवीचे स्वादिष्ट मोदक अर्पण करू शकता. आज बाप्पासाठी शाही मोदक तयार करू शकता. हे मोदक बनवणे खुप सोपे आहे. शाही मोदक कमी वेळेत तयार होतात. घरातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हे मोदक आवडेल. शाही मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

शाही मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

नारळ खिस

तूप

पिस्ता पावडर

काजू पावडर

बदाम पावडर

कंडेन्स मिल्क

वेलची पावडर

केसर दूध

शाही मोदक बनवण्याची कृती

शाही मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये नारळाचा खिस भाजून घ्यावा.

नंतर त्यात कंडेन्स मिल्क मिक्स करावे.

नंतर त्यात बदाम पावडर मिक्स करावे.

नंतर त्यात पिस्ता पावडर मिक्स करा.

नंतर काजू पावडर मिक्स करा.

सर्व सारण चमच्याने चांगले भाजून घ्यावे.

नंतर त्यात वेलची पावडर टाका.

नंर तूप टाका.

नंतर केशर दूध मिक्स करावे.

नंतर एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवावे.

मोदकाचा साचा वापरून एकसारखे मोदक तयार करावे.

तयार शाही मोदक बाप्पाला अर्पण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Dombivli Election : आमदारांच्या मुलाचा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगात!

Sudhakar Badgujar : नाशिक भाजपमध्ये बडगुजर पॅटर्नचा धमाका; पत्नी आणि पुत्रासह स्वतःची उमेदवारी केली निश्चित

Latest Marathi News Live Update : एरंडोल नगरपालिका निवडणुकीत पाच अविवाहित युवकांचा विजय

BEE Star Rating : इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीचे नियम बदलले; लागू झाला BEE स्टार रेटिंगचा आदेश, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

Khus Khus Halwa: गाजर किंवा मूगडाळीचा हलवा विसरा! या हिवाळ्यात ट्राय करा पौष्टिक आणि चविष्ट ‘खसखस हलवा’

SCROLL FOR NEXT