Modak Ganeshotsav 2022 Esakal
ganesh food recipe

Ganeshotsav 2022: ड्रायफ्रुट्स मोदक कसे तयार करायचे?

आपल्या लाडक्या बाप्पासाठी तुम्ही खास मोदक बनवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना मुलांच्या आवडीचा देखील विचार करा आणि ट्राय करा ड्रायफ्रुट्स मोदक. आजपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन होते. काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात आज आपण खास ड्रायफ्रुट्स कसे तयार करायचे?

बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू सहज उपलब्ध होत असल्या, तरी घरी बनवलेल्या प्रसादाची चव वेगळी असते. आपल्या लाडक्या बाप्पासाठी तुम्ही खास मोदक बनवू शकता. बाप्पासाठी ड्रायफ्रुट्सचे मोदक कसे बनवायचे ते आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

साहित्य:

8 ते 10 खजूर

अर्धा वाटी भाजलेले बदाम

अर्धा वाटी काजू

अर्धा वाटी ड्राय फ्रूट्स (पिस्ता,अक्रोड,)

मेपल सरबत

कृती:

ड्रायफ्रुट्सचे मोदक बनवण्यासाठी ड्रायफ्रुट्स हलके सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे. नंतर खजूरमधील बिया काढून टाकाव्या. खजूर आणि इतर सर्व सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे आणि ते कणिके सारखे होईपर्यंत बारीक करावे. त्या मिश्रणाने मोदक बांधणार नाहीत असे वाटत असेल तर आणखी काही खजूर घालून पीठ मळून घ्यावे.योग्य पीठ तयार झाल्यावर, मेपल सिरपने साच्याला ग्रीस करा आणि या मिश्रणाचा मोठा भाग घ्या आणि आत घाला. एक परिपूर्ण आकार तयार करण्यासाठी सर्व बाजूंनी पुरेसे मिश्रण घाला. त्याचप्रमाणे सर्व मोदक बनवा आणि बनवल्यानंतर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files : रशियन पासून अफ्रिकन पर्यंत अशा निवडल्या जायच्या मुली, कसा ठरवला जायचा रेट? जगाला हादरवणारे High Profile Sex Scandal

VIDEO : आईचा हात धरुन तलवार हातात घेत दिव्यांग मुलगा स्टेजवर चढला…; शिवरायांच्या वेशातील 'हा' व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांची मॉक ड्रिल आणि रूट मार्च...

IPL 2026 Update: कॅमेरून ग्रीनसाठी २५.२० कोटी मोजणारा KKR संघ विक्रीला; शाहरूख खान, जुही चावला यांचा आहे मालकी हक्क, पण...

नाटकप्रेमींनो लक्ष द्या! विजय केंकरे दिग्दर्शित "सुभेदार गेस्ट हाऊस" लवकरच रंगभूमीवर; कधी आहे शुभारंभाचा प्रयोग

SCROLL FOR NEXT