ठाणे: पावसाळा सुरु झाला की मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात कुठे न कुठे, दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे नैसर्गिक, वित्त आणि जीवितहानी होऊन लोकांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडतात. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात यावर्षी जुलै महिन्यात अशीच एक घटना घडली. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले "तळीये" दरड कोसळल्याने बघताबघता सह्याद्रीच्या कुशीत गडप झाले. महाराष्ट्रात वारंवार घडणाऱ्या दरडग्रस्थ घटनांची कारणे आणि त्या थांबवण्यासाठी कोणत्या उपायोजना केल्या जाऊ शकतात याविषयावर ठाण्यातील शिंदे कुटुंबाने घरगुती देखावा साकारला आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी भागात राहणारे प्रणय शिंदे आणि कुटूंबीय मागील २६ वर्षांपासून घरगुती गणेशोत्सव साजरा करतात. ६ वर्षांपासून ते गणपतीनिमित्त समाजप्रबोधनपर देखावे साकारत असून यापूर्वी केरळच्या हत्तीणीवर झालेला हिंसाचार, कोल्हापूर सांगली येथील महापूर अश्या विविध विषयांवर देखावे साकारले आहेत. यावर्षी त्यांनी तळीये येथील दरड दुर्घटनेवर "एक होते तळीये" हा देखावा साकारला असून तो तयार करण्यासाठी कुटुंबाला ३ दिवसांचा अवधी लागला. आधीचे तळीये गाव कसे होते, दरड कोसळण्याची घटना कशी घडली, खडतर परिस्थितीत ठाण्याच्या टीआरडीएफ आणि एनडीआरएफ जवानांनी केलेली कामगिरी, दुर्घटनेतून वाचलेले आणि मृत पावलेले जीव, दरडग्रस्थ घटनांन मागची कारणे, त्याथांबवण्यासाठी उपायोजना इत्यादी बाबींची सखोल माहिती देखाव्यातून प्रकट करण्यात आली आहे. देखावा वास्तववादी वाटावा याकरता डोंगर, पायथ्याशी वसलेले गाव, दुर्घटनेत मृतपावलेले लहान मुलं तसेच दुर्घटनेचे फोटो इत्यादींच्या प्रतिकृती येथे ठेवण्यात आल्या आहेत.गावातील घरांमध्ये चूल पेटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड केली जाते. डोंगर उतारावरील झाडे तोडून माती थांबवून ठेवण्याची संरक्षण ढाल काढून टाकल्याने वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येते.तेव्हा गावात गोबरगॅस, बायोगॅसच्या वापराबाबत जनजागृती करून मोहिम राबवली तर वृक्ष तोड काही प्रमाणात कमी होऊन दरड कोसळण्याच्या घटनांना आळा बसेल, असा संदेश देखाव्यातून शिंदे कुटुंबाने दिला आहे.दरवर्षी घरगुती गणेशोत्सवात सामाजप्रबोधनपर देखावा साकारण्याचा मानस असतो. प्रत्येक वर्षी दरड कोसळण्याची घटना घडून मोठ्याप्रमाणात जीवितहानी होत असते. ह्या दुर्दैवी घटना कुठेतरी थांबाव्यात आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने प्रयत्न करावेत यासाठी देखाव्याच्या माध्यमातून हा विषय मांडल्याचे प्रणय शिंदे यांनी सांगितले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.