Bird flu H5N1
Bird flu H5N1 Esakal
ग्लोबल

Bird flu H5N1: कोरोनापेक्षा १०० पटींनी प्राणघातक आहे बर्ड फ्लू; अर्ध्याहून अधिक रुग्णांचा झालाय मृत्यू! नव्या महामारीचा धोका?

अंकिता खाणे (Ankita Khane)

Bird flu H5N1: कोरोना सारख्या भंयकर माहामारीतून जग पुर्णपणे सावरत असतानाच आणखी एका महाामारीने चिंता वाढवली आहे. H5N1 म्हणजेच बर्ड फ्लू महामारी पसरण्याची शक्यता आहे, हा आजार कोरोनापेक्षाही भयंकर आहे. बर्ड फ्लू H5N1 च्या संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हा नवीन आजार कोरोना महामारीपेक्षा 100 पट जास्त धोकादायक ठरू शकतो. या फ्लूमुळे निम्म्याहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यांनी भीती व्यक्त केली आहे की, व्हायरसच्या संसर्गाची पातळी वाढल्यास जागतिक महामारी होऊ शकते.

पिट्सबर्गमधील प्रमुख बर्ड फ्लू संशोधक डॉ. सुरेश कुचीपुडी यांनी इशारा दिला आहे की H5N1 मध्ये साथीचा रोग निर्माण होण्याची क्षमता आहे. याचे कारण म्हणजे या संसर्गामधे मानवांना तसेच अनेक सस्तन प्राण्यांना देखील संक्रमित करण्याची क्षमता आहे.

जॉन फुल्टन, फार्मास्युटिकल उद्योग सल्लागार आणि कॅनडा-आधारित फार्मास्युटिकल कंपनी बायोनियाग्राचे संस्थापक, यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. H5N1 ने महामारीचे रूप धारण केले तर ते खूप गंभीर असेल असेही त्यांनी म्हटले आहे. H5N1 हा कोरोनापेक्षा जास्त घातक आहे. फुल्टन यांनी सांगितले की, हे कोविडपेक्षा 100 पट वाईट आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2003 पासून H5N1 बर्ड फ्लूची लागण झालेल्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 887 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी एकूण 462 मृत्यू झाले आहेत. त्याच वेळी, कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू दर 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. साथीच्या रोगाच्या सुरूवातीस ते सुमारे 20 टक्के होते.

काय आहे हा रोग? (Bird Flu Information in Marathi)

बर्ड फ्लू (Bird Flu) अथवा ज्याला एव्हीयन इन्फ्लूएंझा असं म्हटलं जातं हा रोग बहुतांश वेळेला पक्ष्यांमध्ये आढळतो. मात्र, इतर प्राणी तसेच माणसांना संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूमध्ये निश्चितच आहे. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मारणाऱ्या विषाणूचा H5N1 हा स्ट्रेन कॉमन आहे. अर्थातच कोरोनामुळे आता तुम्हाला विषाणू, त्याचा स्ट्रेन, त्याचा प्रकार या सामान्य बाबी आता समजल्याच असतील.

जसा कोरोनाचा नवा स्ट्रेन सध्या धुमाकूळ घालतो आहे, अगदी तसेच बर्ड फ्लूच्या विषाणूचे देखील इतर अनेक स्ट्रेन आहेत. जसे की H5N7 आणि H5N8 असे... आणि हेदेखील संसर्गजन्य तसेच जीवघेणे आहेत. हा व्हायरस सर्वांत आधी गीस या पक्ष्यामध्ये आढळला... तो सुद्धा चीनमध्ये... चीन ही विषाणूंची जननी आहे.. असं छातीठोकपणे म्हणायला आता काही हरकतच उरली नाहीये... आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा विषाणू आणि हा रोग जगभरात सापडत गेला.

भारतामध्ये हा विषाणू पहिल्यांदा महाराष्ट्रात सापडला होता. 2006 मध्ये नंदूरबारमध्ये याची पक्ष्यांना लागण झाली होती. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये आढळलेल्या पक्ष्यांच्या शरिरामध्ये H5N8 हा स्ट्रेन सापडला आहे तर हिमाचल प्रदेशातील पक्ष्यांच्या चाचणीमध्ये H5N1 हा विषाणू सापडला आहे. कशी घ्याल काळजी :

कशी घ्याल काळजी?

देशभरात आपण एकीकडे कोरोनाशी लढत असताना आता बर्ड फ्लूचं संकट घोंगावतंय. अशात स्वच्छतेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

स्वतःबाबतची स्वच्छता सोबतच आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

बर्ड फ्लू हा पक्षांमुळे पसरतो, त्यामुळे आपल्या आसपास पक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर असेल तर अधिकची स्वच्छता गरजेची आहे.

आपल्या घराच्या खिडक्या, छत, जाळ्या जंतुनाशकांनी नीट साफ करा.

कबुतरांना दाणे टाकणे बंद करा

बाहेरून तुम्ही चिकन आणत असलात तर चिकन आणताना देखील काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

हातात ग्लोव्स आणि तोंडावर मास्क घालून चिकन आणायला जा.

कोरोनाची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळायलाच हवं.

चिकनच्या दुकानात किंवा कत्तलखात्यात काम करणाऱ्याला हाय रिस्क म्हणून पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा माणसांपासून सुरक्षित अंतर ठेऊन व्यवहार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT