15 year old teenager arrested, firing at mall,wisconsin,america  
ग्लोबल

अमेरिकेतील मॉलमधील गोळीबार प्रकरणात 15 वर्षांच्या मुलाला अटक

सकाळ ऑनलाईन टीम

अमेरिकेतील विस्कॉन्सिन मॉलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. दोन गटातील वादातून मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 8 जण गंभीर जखमी झाले होते. गोळीबाराच्या घटनेनंतर 15 वर्षीय मुलगा अन्य लोकांसह मॉलच्या बाहेर पळत आला होता, अशी माहिती देखील पोलिसांनी दिलीय.

पोलिस अधिकाऱ्याने याप्रकरणात 15 वर्षीय मुलाला अटक केल्याचे स्पष्ट केले असले तरी त्याच्या नावासंदर्भात कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल केला आहे, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. संबंधित मुलाकडून हत्यार देखील जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मॉल बंद होता. या घटनेनंतर रविवारी मॉल पुन्हा सुरु करण्यात आलाय. दोन गटात कोणत्या तरी कारणावरुन वाद झाल्यानंतर गोळीबाराची घटना घडली होती, असे पोलिसांनी म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विस्कॉन्सिन (Wisconsin mall) येथील मॉलमध्ये शुक्रवारी अंदाधूंद गोळीबार झाला होता. या गोळीबारात 8 लोकं गंभीर जखमी झाले. सुदैवाने कोणलाही प्राण गमवावे लागले नव्हते.  गोळीबार सुरू होताच पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरला होता.  75 अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला होता.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT