ग्लोबल

कोरोनात वाढदिवसाची पार्टी भोवली,150 जणांना पोलिसांनी केली अटक

नामदेव कुंभार

California beach party Viral video TikTok : कोरोना महामारीनं (Covid-19) जगभरात हाहा:कार माजवला आहे. काही देशांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र अद्यापही काळजी संपलेली नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क यासारख्या गोष्टींचं पालन केलं जातं तसेच सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावर बंदीही घालण्यात आलेली आहे. असं असतानाही काही ठिकाणी लोक नियम धाब्यावर ठेवून आपली मनमानी करत असल्याचं प्रकार घडत आहेत. कॅलिफोर्नियामधील (California) अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी शेकडोनं समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करत कोरोनाचा नियम मोडला. व्हिडिओ TikTok वर व्हायरल झाल्यानंतर कॅलिफोर्निया पोलिसांनी कारवाई करत 150 जणांना अटक केली आहे. (150 arrested after viral TikTok video draws hundreds to California beach party)

शनिवारी दक्षिण कॅलिफोर्नियातील (California) हंटिंगटोन बीचवर वाढदिवसाच्या पार्टीला शेकडो तरुण-तरुणींनी हजेरी लावली होती. पार्टीमध्ये कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं निदर्शनास आलं. या पार्टीतील एक व्हिडिओ TikTok वर व्हायरल झाला. या व्हिडिओला 180 मिलियन लोकांना पाहिलं आहे. हा व्हिडिओ सद्या TikTokवरुन डिलीट करण्यात आला आहे. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तात्काळ कारवाई करत तब्बल 150 जणांना ताब्यात घेतलं. बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

adrian.lopez517 या युजर्सनं आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ TikTok वर अपलोड केला होता. adrian.lopez517 ने सर्वांना वाढदिवसाच्या पार्टीसाठी हंटिंगटोन बीचवर शनिवारी रात्री आमंत्रण दिलं होतं. पार्टीला गेलेल्या एका व्यक्तीनं New York Times ला सांगितलं की, कोरोनानंतर अशाप्रकारची ही पहिलीच पार्टी आहे. पार्टीला जवळपास 400 जण उपस्थित होते.

बिचवर पार्टीसाठी जमलेल्या लोकांनी फटाके फोडण्यासाठी सुरुवात केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना पांगवण्याच्या सूचना केल्या. मात्र, लोकांनी न एकता पार्टी सुरुच ठेवली. त्यामुळे नाईलाजास्तव हे बेकायदेशीर असल्याचं घोषीत करत कारवाई करावी लागली, असं पोलिस आधिकारी ब्रायन स्मिथ यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT