ग्लोबल

कोरोनानंतर जीवघेण्या मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव, WHO ने दिला इशारा

नामदेव कुंभार

मागील दीड वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. या संकटाला सामोरं जात असतानाच आणखी एका संसर्गजन्य आजाराने चाहूल दिली आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये मारबर्ग विषाणूचा रुग्ण आढळला आहे. हा जीवघेणा आजार इबोला आणि कोरोनासारखा संसर्गजन्य आहे. गिनीमध्ये मारबर्ग विषाणू आढळल्याच्या माहितीला जागतिक आरोग्य संघटनेनं दुजोरा देताना सावध राहण्याचा इशाराही केला आहे.

पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये मरबर्ग विषाणूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. इबोलाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वीच आटोक्यात आला होता. त्यानंतर आता एका व्यक्तीला संसर्गजन्य ताप आला. तपासणी केली असताना रुग्णाला मारबर्ग विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पण मारबर्ग विषाणूचा प्रादुर्भाव कसा झाला याबाबत तज्ज्ञ शोध घेत आहेत.

कोरोना विषाणूप्रमाणेच मारबर्गचाही प्रादुर्भाव आणि संसर्ग वेगानं होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. आफ्रिका येथील जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे क्षेत्रीय निर्देशक, मात्शिदिसो मोएती यांनी याबाबत सांगितले की, मारबर्ग हा विषाणू अतिशय धोकादायक अन् घातक असून कोरोनाप्रमाणे संसर्गजन्य आहे. याचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच याला लवकरात लवकर थोपवणं गरजेचं आहे. पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये तपासणीचा वेग वाढवला असून लागण झालेल्या रुग्णाचा शोध सुरु आहे.

वटवाघुळानं खाल्लेली फळं खाल्ल्यामुळे मारबर्ग विषाणूचा माणसांमध्ये पसरतो, असं WHO ने सांगितलं आहे. मारबर्ग विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील द्रवांशी थेट संपर्कात आल्यानं याचा संसर्ग होतो. त्यानंतर या विषाणूचा संसर्ग माणसांमध्ये वाढतो.

लक्षणं काय आहेत?

ताप

डोकेदुखी

शरीरांतर्गत रक्तस्त्राव

डब्ल्यूएचओनं दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचा मृत्यूदर 24 ते 88 टक्क्यांमध्ये आहे. तसेच या विषाणूविरोधात प्रतिबंधक लस अद्याप उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT