Fire Accident Esakal
ग्लोबल

Fire Accident: चीनमध्ये मोठी दुर्घटना; रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू

तर 71 जणांना वाचवण्यात यश आले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधील एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 71 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील चांगफेंग हॉस्पिटलमध्ये हा अपघात झाला.

रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी 21 लोकांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, घटनेचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यातील एका रुग्णालयाच्या इमारतीला दुपारी 12:57 वाजता आग लागली.

त्याचवेळी चीनमध्ये आग लागण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पूर्वेकडील झेजियांग प्रांतातील जिन्हुआ शहरातील वुई काउंटीमधील कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:04 वाजता ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT