Lewiston USA esakal
ग्लोबल

मोठी बातमी! अमेरिकेच्या लेविस्टनमध्ये अंदाधुंद गोळीबार; 22 ठार तर 60 नागरिक गंभीर जखमी, हल्लेखोराचा Photo केला जारी

लेविस्टन हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे.

सकाळ डिजिटल टीम

अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयानं संशयिताचे दोन फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील लेविस्टन (Lewiston) शहरात एका व्यक्तीनं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आलीये.

यात डझनभर लोक गंभीररित्या जखमी झालेत, तर गोळीबारात 50 ते 60 जण जखमी झाल्याची माहिती आहे. यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सक्रिय शूटरनं बुधवारी रात्री हा गोळीबार केलाय.

अँड्रोस्कोगिन काउंटी शेरीफ कार्यालयानं संशयिताचे दोन फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. लेविस्टन पोलिसांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, ते लेविस्टनमध्ये सक्रिय शूटरसंदर्भात काळ्या रंगाचे फ्रंट बंपर असलेल्या वाहनाचा शोध घेत आहेत.

मेन स्टेट पोलिसांनी सीएनएनला याबाबत सांगितलंय की, ते संशयिताच्या कारचा शोध घेत आहे. तर केंद्रानं सांगितलं की, ते रुग्णांना दाखल करण्यासाठी प्रादेशिक रुग्णालयांशी समन्वय साधत आहेत. लेविस्टन हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे.

मेनच्या गव्हर्नर जेनेट मिल्स (Maine Governor Janet Mills) यांनी बुधवारी रात्री सांगितलं की, मला या परिस्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. लेविस्टनमधील सक्रिय शूटर्सचा आम्ही शोध घेत आहोत. मी परिसरातील सर्व लोकांना राज्य आणि स्थानिक अंमलबजावणीच्या निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. मी या परिस्थितीचं निरीक्षण करत असून सार्वजनिक सुरक्षा अधिकार्‍यांच्या जवळच्या संपर्कात राहून माहिती जाणून घेत आहे, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

SCROLL FOR NEXT