mouth to hell sakal
ग्लोबल

'नरका'च्या दरवाज्याचा आकार वाढतोय; काय आहे कारण? जाणून घ्या..

सायबेरियामध्ये 1980 मध्ये सर्वात प्रथम हा खड्डा निदर्शनास आला होता. याचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्याने याला लोक नरकाचे द्वार म्हणतात.

सकाळ डिजिटल टीम

निसर्गाच्या अनेक किमया आपण पाहत असतो. कधी कधी कल्पनेपलीकडचे रहस्यही निसर्ग आपल्याला दाखवत असतो. अशातच रशियाच्या सायबेरियन भागात असंच एक रहस्य अनुभवाला मिळत आहे. याठिकाणी 282 फूट खोल एक खड्डा आहे, ज्याला लोक 'माउथ टू हेल' (Mouth to Hell) नावाने ओळखतात. हे एक रहस्यमय छिद्र असून दिवसेंदिवस याचा आकार वाढत जात असल्याने चिंतेचा विषय बनलाय. (282 foot deep crater spread around siberia in russia)

सायबेरियामध्ये 1980 मध्ये सर्वात प्रथम हा खड्डा निदर्शनास आला होता. याचा आकार दिवसेंदिवस वाढत असल्याने याला लोक नरकाचे द्वार म्हणतात.

1980 मध्ये सर्वात प्रथम हा खड्डा निदर्शनास आल्यानंतर हा खड्डा दरवर्षी 20 ते 30 मीटर वाढत आहे. या वेगाने हा रशियातील परीसर आपल्या ताब्यात घेत आहे. जर अशीच वाढ होत असली तर आजुबाजूचा परीसर खड्ड्यात जाणार, अशी शक्यता वर्तवली जातेय.

या खड्ड्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून माती बाहेर पडते जी लाखो वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. हे रशियातील सर्वात जुने खुले विवर असल्याचे बोलले जाते.

नरकाचा दरवाजा म्हणून ओळख असलेला हा परिसर १९६० मध्ये जंगले साफ केल्यानंतर आढळून आला. असं म्हणतात, पृष्ठभागाला उष्णता आणि सूर्यप्रकाश मिळाल्याने हा परिसर ढासळू लागला आणि खड्डा निर्माण झाला. सध्या हा खड्डा वाढत असल्याने नरकाचे द्वार वाढत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara News : कंत्राटी महिलांनाही आता २६ आठवडे प्रसूती रजा, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

FIFA World Cup: श्वास रोखून धरणारा सामना! ९२ व्या मिनिटाला गोल अन् कॅनडाची उपांत्यपूर्व फेरीत धडक, इतिहासही घडवला

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Chandrapur: लग्नाला वर्ष झालं तरी मूलबाळ नाही, मी मदत करतो; १९ वर्षीय विवाहितेवर बळजबरी, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा

Pune News : मद्यपान करून रेल्वे प्रवास करणाऱ्यांना दणका; दोषी आढळल्यास आता थेट कारवाई

SCROLL FOR NEXT