Employee Sakal
ग्लोबल

तणाव कमी करण्यासाठी ४ दिवसांचा आठवडा; ६० टक्के नागरिकांची पसंती

भारतातील जास्तीत जास्त कर्मचारी यासाठी सहमत आहेत असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील आणि जगातील अनेक कंपन्यांनी ४ दिवसाच्या आठवड्याचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांसमोर मांडला असून यासाठी कर्मचारी सहमत असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. कामाचा तणाव कमी करण्यासाठी भारतातील जास्तीत जास्त कर्मचारी यासाठी सहमत आहेत असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

HR Solutions Genius Consultants च्या रिपोर्टनुसार ६० टक्के कर्मचारी यासाठी सहमत आहेत आणि कामातील समाधान, काम आणि वैयक्तिक जीवनातील समतोल, आणि कामातून होणाऱ्या तणावाला कमी करण्यासाठी ४ दिवसांच्या आठवड्याला कर्मचाऱ्यांनी पसंती दिली आहे. दरम्यान या सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्या २७ टक्के कर्मचारी म्हणाले की, यामुळे कंपनीच्या कामावर आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तसेच ११ टक्के कर्मचारी या प्रस्तावासाठी असहमत असल्याचं आढळून आलं. ते म्हणाले की यामुळे कोणतेही साकारात्मक बदल होण्यास मदत होणार नाही त्यामुळे आम्हाला यावर वाद घालण्याची इच्छा नाही.

दरम्यान हा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने १ मार्च ते ७ मार्चच्या दरम्यान घेण्यात आला होता. यामध्ये जवळपास १११३ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बॅकिंग, अर्थ क्षेत्र, शिक्षण, अभियंता, बांधकाम, HR, IT अशा बऱ्याच क्षेत्रांतील लोकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील सर्व लोकांनी ४ दिवसांच्या आठवड्याला संमती दर्शवली आहे. दरम्यान तुम्ही या सु्ट्टीच्या दिवसाची भरपाई करण्यासाठी १२ तास काम करण्यासाठी तयार आहात का? असा प्रश्न विचारल्यावर ५६ टक्के लोक यासाठी तयार झाले आणि उरलेल्या ४४ टक्के लोकांनी १२ तास काम होईल की नाही याची खात्री नसल्याचं सांगितलं.

तसंच ६० टक्के लोकं सुट्ट्यांची भरपाई करण्यासाठी १२ तासांपेक्षा अधिक वेळ काम करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. तसंच ६६ टक्के कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामामुळे उत्पादनावर साकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्वास दाखवला आहे.

दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी या मॉडेलचे स्वागत केले असून काही कर्मचाऱ्यांनी कामावर परिणाम होण्याच्या कारणावरुन यासाठी विरोध दर्शवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT