suv 
ग्लोबल

VIDEO: पाच वर्षाच्या मुलाचा प्रताप; वर्दळीच्या ठिकाणी एकटाच चालवतोय Land Cruiser

सकाळवृत्तसेवा

मुलतान : पाकिस्तानमधील एक व्हिडीओ सध्या भलताच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाच वर्षाचा मुलगा एक स्पोर्ट युटीलीटी व्हेईकल चालवताना दिसत आहे. निव्वळ 27 सेंकदाच्या या व्हिडीओमध्ये हा चिमुरडा मुलगा काळ्या टोयोटा लँड क्रूझर V8 वाहनाचं स्टेअरिंग पकडून ती सुसाट चालवताना दिसत आहे.  हा मुलहा पाकिस्तानातील मुलतानमधील बोसनमधल्या वर्दळीच्या ठिकाणी ही कार चालवताना दिसत आहे. एक चिमुरडा मुलतानमध्ये लँड क्रूझर चालवत आहे. त्याचे पाय तरी पेडल्सवर कसे पोहचत आहेत? असं या व्हिडीओच्या वर कॅप्शन देण्यात आलं आहे. 

या व्हिडीओमध्ये हा मुलगा स्टेअरिंगसमोर उभा असलेला दिसत आहे. या कारमध्ये इतर कुणी मोठी जबाबदार व्यक्ती दिसून येत नाहीये. आश्चर्य म्हणजे या चिमुरड्याला कुठल्याही चौकात कुणाही ट्राफिक पोलिसाकडून थांबवलं गेल्याचं दिसत नाहीये.  हा व्हिडीओ जितकं लोकांना आश्चर्यचकित करत आहे तितकंच त्याबाबत चिंताही व्यक्त केली जात आहे. इतका लहान चिमुरडा कुणाही जबाबदार व्यक्तीशिवाय इतकं मोठं वाहन इतक्या वर्दळीच्या ठिकाणी चालवत असेल तर ते चिंतेचं असल्याचं काहींनी म्हटलंय.

याबाबत व्यक्त होताना एकाने म्हटलंय की, जरी ही काही गम्मत असली तरीही ही गाडी जप्त केली पाहिजे तसेच या मुलाच्या पालकांना शिक्षा केली गेली पाहिजे. हा काही विनोद नाहीये तर हे गंभीर  प्रकरण आहे. सोमवारी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ ट्राफिक पोलिसांनी या मुलाला आणि त्याच्या पालकांना शोधून काढण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT