earthquake 
ग्लोबल

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडने सुनामीचा इशारा घेतला मागे; दक्षिण प्रशांत महासागरात आला होता 7.7 तीव्रतेचा भूकंप

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- दक्षिण प्रशांत महासागरात (South Pacific Ocean) आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे (Earthquake) सुनामी (Tsunami)  आल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभाग ब्यूरोने ट्विट करत याची पुष्टी केली आहे. या सुनामीमुळे लॉर्ड होवे द्वीपवर धोका निर्माण झाला आहे, हा भाग ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमिच्या जवळपास 550 किमोमीटर पूर्वेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने सांगितले की, लॉयल्टी द्वीप समूहाजवळ 7.7 तीव्रतेचा भूकंप आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडसाठी या सुनामीचा कोणताही धोका नाही. 

भारतीयांच्या गळ्यातील ताईत हिमा दास आता बनणार 'डीएसपी'

अमेरिकी जियोलॉजिकल सर्व्हेने म्हटलं की न्यूझीलँड, न्यू कॅलेडोनिया, वानुअतु आणि जवळपासच्या अन्य देशांसाठी सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. भूकंप स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री कॅलेडोनियाच्या उत्तर भागात जवळपास 415 किलोमीटर पूर्वेला आला. एनडब्ल्यूएस प्रशांत सुनामी वॉर्निंग सेंटरने सांगितलं की येत्या काळात भूकंपामुळे धोकादायक सुनामी लाटा येऊन शकतात. फिजी, न्यूझीलँड आणि वानुअतुच्या किनाऱ्यावर 0.3 ते 1 मीटरपर्यंत लाटा येऊ शकतात. 

लोकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर जाण्यास सांगितले

न्यूझीलँडच्या नॅशनल इमरजेंसी मॅनेजमेंट एजेन्सीने सांगितले की, किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांनी तेथून दूर जावे. एजेन्सीने सांगितलं की, 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे न्यूझीलँडच्या किनारी भागात सामान्य ते मजबूत लाटा अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. या भागातील लोकांनी समुद्राच्या जवळ जाऊ नये. तसेच बंदर आणि नद्यांपासून दूर रहावे. एजेन्सीने एक नकाशा जारी केलाय. या प्रभावीत क्षेत्राची माहिती देण्यात आली आहे. न्यूझीलँडच्या उत्तर द्वीपच्या सुदूर उत्तरेला, ऑकलँडच्या पूर्वेला ग्रेट बैरियर द्वीप आणि देशाच्या पूर्व किनाऱ्यावर याचा प्रभाव जाणवू शकतो. 

न्यूझीलँडच्या उत्तर भागात सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया, कुक आयलँड आणि अमेरिकन समोआसह इतर जवळपासच्या भागात छोट्या आणि सामान्य लाटांचा इशारा देण्यात आला आहे. भूकंप किंवा सुनामीमुळे आतापर्यंत जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडकडून धोक्याचा इशारा मागे घेण्यात आला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: IMDचा मोठा इशारा! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; पुढील २ दिवस कसे असेल हवामान?

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन कधी आहे? राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या मुहूर्त आणि संपूर्ण माहिती

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू; बालकासह आणखी तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात मुसळधार! मुक्ताईनगर, भुसावळ, रावेरसह अनेक भागांत जोरदार हजेरी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले! मोसमातील पहिलाच विसर्ग; धरणात 86.11 टीएमसी साठा, 25 हजार क्युसेकने पाण्याची आवक

SCROLL FOR NEXT