Husband Killed Wife  Sakal
ग्लोबल

व्हायग्रा घेऊन आला 81 वर्षाचा पती; पत्नीने नकार दिल्याने केले वार

व्हायग्रा घेऊन बेडरूममध्ये आलेल्या पतीला पत्नीने नकार दिला.

सकाळ डिजिटल टीम

लग्नानंतर पती-पत्नी आपल्या जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. पंरतु जगभरात काही जोडप्यांमध्ये किंवा त्यांच्या नात्यामध्ये अनेक विचित्र प्रकार घडत असतात. अनेकदा लोक सेक्स पॉवर वाढवण्यासाठी आणि पार्टनरला खुश करण्यासाठी व्हायग्रा घेतात. याच्याशी संबंधित एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आले आहे. व्हायग्रा खाऊन बेडरूममध्ये आलेल्या पतीला पत्नीने नकार दिला. यानंतर संतापलेल्या पतीने आपल्याच पत्नीची हत्या केली. (81-year-old husband brought Viagra; The wife refused and attacked him)

ही विचित्र घटना इटलीतील एका शहरामध्ये घडली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पती व्हायग्रा घेऊन आपल्या पत्नीकडे गेला, तेव्हा पत्नीला व्हायग्राबाबत समजताच तिने संबंध ठेवण्यास नकार दिला. यानंतर पतीला राग आला आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले, हे भांडण इतके टोकाला गेले की पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. रिपोर्टनुसार, या व्यक्तीचे नाव विटो कांगिनी आहे आणि त्याच्या पत्नीचे नाव नतालिया किरिचोक आहे. ही संपूर्ण घटना नाताळच्या रात्री घडली. विशेष म्हणजे पतीचं वय 80 वर्ष असून त्याची पत्नी 61 वर्षांची होती. या वृद्धाने सेक्स करण्यापूर्वी व्हायग्राचा डोस घेतला होता आणि याच कारणामुळे पत्नीने संबंध ठेवण्यास नकार दिला होता.

पत्नीला मारल्यानंतर तो झोपला आणि सकाळी उठल्यानंतर त्याने आपल्या कुत्र्याला फिरायला नेले आणि घरी येऊन जणू काही घडलेच नसल्यासारखे आपले काम करू लागला, पतीने फोनवर पत्नीच्या बॉसला हा संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. हे ऐकून त्याच्या बॉसची तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT