Acute Hunger: Esakal
ग्लोबल

जगातील उपासमारीचं संकट अधिक गडद! संयुक्त राष्ट्राचा ताजा अहवाल चिंतेत टाकणारा

UN led report on Acute Hunger: सध्या जगातील स्थिती अस्थिर आहे. जगातील अनेक देशांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सध्या जगातील स्थिती अस्थिर आहे. जगातील अनेक देशांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. संघर्षामध्ये सर्वाधिक होरपळला जातो तो सामान्य माणूस. याच पार्श्वभूमीवर बुधवारी संयुक्त राष्ट्र एजेन्सी आणि इतर विकास समूहांनी ताजा रिपोर्ट (UN led report) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशातील अन्न सुरक्षेची (acute hunger) भीषण स्थिती समोर आली आहे.

रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट बनला आहे. गाझा पट्टी आणि सूदानमधील संघर्षामुळे २८ कोटींपेक्षा अधिक लोक अन्न मिळत नसल्याने पीडित आहेत. अन्न सुरक्षा सूचना नेटवर्कच्या ( एफएसआयएन) या रिपोर्टनुसार जागतिक वातावरण बदलाच्या घटना आणि आर्थिक धक्क्यांमुळे गंभीर अन्न सुरक्षेच्या प्रश्नाला तोंड देणाऱ्या लोकांची संख्या २०२२ मधील २४ कोटींच्या तुलनेत २०२३ मध्ये वाढली आहे.

अन्न सुरक्षेच्या प्रश्नाला तोंड देणाऱ्या पीडित लोकांच्या संख्येमध्ये वाढ होण्याचे हे सलग पाचवे वर्ष होते. लोकांना अन्नासाठी भटकावं लागतं अन् त्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. यात कारण आणि कालावधी काहीही असू शकतो. अशा प्रकारच्या समस्येला झुंजणाऱ्यांना अन्न सुरक्षा पीडित म्हणून संबोधलं जातं. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी यूरोपीय संघ, संयुक्त राष्ट्र आणि सरकारी-बिगरसरकारी संस्थांना एकत्र आणून एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा विचार सुरु आहे.

सूदान आणि गाझा पट्टीमध्ये (Gaza Worst Hit) अन्न सुरक्षा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणच्या लोकांना एकवेळचे अन्न मिळवणे देखील कठीण झाले आहे. गेल्या वर्षी गाझामध्ये ७ लाख लोक भूकबळीच्या उंबरठ्यावर होते. हा आकडा आता ११ लाखांपर्यंत वाढला आहे. युद्धामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे अन्न आणि कृषी संघटनेच्या आपातकालीन कार्यालयाचे फ्लेर वाऊटर म्हणाले आहेत.

२०१६ मध्ये अन्न सुरक्षेबाबत पहिला रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळी १०.८ कोटी लोक उपासमारीच्या प्रश्नाला भीडत होते, २०२३ मध्ये हेच प्रमाण २८.२ कोटी इतके झाले आहे. अफगाणिस्तान, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, इथियोपिया, नायजेरिया, सीरिया आणि यमन या देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अन्न संकट निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT