Mumbai Bomb Blast Tahir Merchant dead during treatment 
ग्लोबल

1993 साखळी बॉम्ब स्फोटातील मास्टरमाईंड अबू बकर सापडला

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त अरब अमिरातीत मोठी कारवाई झाली आहे. यामध्ये 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या अबू बकरला अटक झाली आहे. भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला पकडण्यात भारतीय एजन्सींना यश आलं आहे. 12 मार्च 1993 ला मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 257 लोकांचा जीव गेला होता. तर, 713 जखमी झाले होते. (1993 Serial Bomb Blast)

पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रं आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देण्यात अबू बकरचा सहभाग होता. मुंबईच्या मालिका बॉम्बस्फोटात वापरलेले आरडीएक्सचं कोकणात लँडिंग आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दुबईतील निवासस्थानी कट रचण्यातही तो सहभागी होता, अशी माहिती तपासात समोर आली होती. 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अबू बकर हा यूएई आणि पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता. यूएईमधील भारतीय एजन्सीच्या माहितीवरून त्याला नुकतेच पकडण्यात आल्याचं कळतंय.

2019 मध्ये अबू बकरला अटक करण्यात आली होती. पण कागदपत्रांच्या समस्यांमुळे तो संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकार्‍यांच्या ताब्यातून सुटला. अधिकृतपणे त्याला जाळ्यात घेण्यात अपयश आलं होतं. यूएईने त्याला अटक केल्यानंतर आता भारतीय एजन्सी बकरच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत आहेत. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचं नाव आल्यानंतर जवळपास 29 वर्षांनी बकर सापडला आहे. त्याचं प्रत्यार्पण करण्याच्या प्रक्रियेत कायदेशीर अडथळेही येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

चंद्रपूर मनपामध्ये अविश्वासाचे ढग, भाजपातील अंतर्गत वाद चिघळणार; संख्याबळाचे समीकरण गुंतागुंतीचे

महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; राज्यात ३५ हजार ८७६ पदांची भर, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

सावकारने किडनी विकलेल्या चंद्रपुरातील शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी, न्यायासाठी रोशन कुडेंची पायपीट सुरूच...

Lamangaon-Takli leopard scare: लामणगाव-टाकळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप

SCROLL FOR NEXT