french 
ग्लोबल

अंगावरचे सर्व कपडे स्टेजवरच काढले; पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीनं नोंदवला निषेध

सकाळ डिजिटल टीम

पॅरिस - फ्रेंच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये शुक्रवारी एका अभिनेत्रीनं मंचावरच सर्व कपडे उतरवल्यानं खळबळ उडाली. शुक्रवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री कोरिन मासेरियो हिने निषेध करत कपडे उतरवले. 57 वर्षीय अभिनेत्री जेव्हा स्टेजवर पोहोचली तेव्हा तिने गाढवासारखा दिसणारा पोषाख घातला होता. त्यावर रक्ताचे डागही होते. मंचावर पोहोचल्यानंतर समोर बसलेल्या लोकांच्या काही लक्षात येईपर्यंत स्टेजवर निषेध नोंदवत तिने कपडे उतरवायला सुरुवात केली आणि नग्न झाली. याचा व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुरस्कार सोहळ्याला उपस्थित कलाकारांनीही सरकारचा निषेध केला आहे.

फ्रान्समध्ये गेल्या तीन महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद पडली आहेत. फ्रेंच अभिनेत्री कोरिन यांनी यावेळी म्हटलं की, सरकारने कोरोनाच्या या संकटकाळात संस्कृती आणि कलेशी संबंधित लोकांना मदत करायला हवी. लोक संकटात सापडले असून त्यांना मदतीची गरज आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

कोरिन मासेरिओ यांना स्टेजवर बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यांनी स्टेजवर सर्वांसमोर कपडे उतरवून सर्वांनाच धक्का दिला. स्टेजवर अभिनेत्री पूर्णपणे नग्नावस्थेत होती. तसंच शरिरावर मेसेजही लिहिला होता. त्यावर म्हटलं होतं की, नो कल्चर, नो फ्यूचर, जर संस्कृतीच नसेल तर भविष्य नाही. 

फ्रेंच पंतप्रधान कॅस्टेक्स यांना विनंती करण्यासाठी कोरिन यांनी पाठीवरसुद्धा एक मेसेज लिहिला होता. त्यात म्हटलं होतं की, जीन, आमची संस्कृती आम्हाला परत द्या. आमच्याकडे पैसे कमावण्यासाठी साधन नाही, आम्ही काम कसं करायचं, जगायचं कसं असा प्रश्न यातून कोरिन यांनी विचारला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरिन मासेरियो यांच्यासह समारंभात इतर कलाकारांनीसुद्धा निषेध नोंदवला. स्क्रीनप्लो अवॉर्ड मिळवणाऱ्या स्टीफन डेमोस्टिअर यांनी भाषणात सांगितलं की, आमची मुलं जारामध्ये कपडे खरेदीसाठी जाऊ शकतात. मात्र चित्रपट बघायला जाऊ शकत नाहीत. हे समजण्याच्या पलिकडचं आहे. 

याआधी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शेकडोंच्या संख्येनं कलाकार, दिग्दर्शन, संगीतकार आणि चित्रपट टेक्निशिअन्स यांनी आंदोलन केलं होतं. पॅरिसमध्ये चित्रपट आणि कला वाचवण्यासाठी त्यांनी आवाज उठवला होता. फ्रान्सने अद्याप देशात थिएटर आणि चित्रपटगृहांवर प्रदर्शनाला बंदी घातली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

Satara Farm Fire : खटावात शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख; सीताफळाची तब्बल 2200 झाडे भस्मसात, पाच वर्षांच्या मेहनतीची झाली माती

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

SCROLL FOR NEXT