Rosemond Brown Rosemond Brown
ग्लोबल

अभिनेत्रीने मुलासोबत पोस्ट केला अश्लील फोटो; तीन महिन्यांची शिक्षा

अभिनेत्रीने एप्रिल महिन्यात हा फोटो पोस्ट केला होता

सकाळ डिजिटल टीम

मुलाचा वाढदिवस हा कोणत्याही आईसाठी खास असतो. आईची इच्छा असते की तिने मुलासाठी काहीतरी करावे. ज्यामुळे तिला खूप आनंद मिळेल. परंतु, पश्चिम आफ्रिका देश घानाच्या एका अभिनेत्री (actress) आईने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला असे काही केले ज्यामुळे तिला तुरुंगात जावे लागले. याशिवाय सोशल मीडियावरही अभिनेत्रीवर टीका होत आहे. रोजमंड ब्राउनने (Rosemond Brown) असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, घानाची अभिनेत्री रोजमंड ब्राउनने (३२) एप्रिलमध्ये मुलाच्या सातव्या वाढदिवशी मुलासोबत नग्न फोटो (Bad photo) काढला आणि सोशल मीडियावर (social media) पोस्ट केला. आपल्या मुलाला एक विचित्र भेट देण्यासाठी तिने हा प्रकार केला. अभिनेत्री अकुपेम पोलू या (Akupem Polu) नावानेही प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीने एप्रिल महिन्यात हा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पोस्ट करताच ती सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आली आणि बातम्यांची हेडलाइन बनली. ती सिगंल मदर (Single mother) आहे.

फोटोमध्ये ती तिच्या मुलासोबत दिसत आहे. अभिनेत्रीने एकही कपडा घातलेले नाही. तर जवळच उभा असलेला तिचा मुलगा फक्त अंडरवेअरमध्ये आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. अभिनेत्रीच्या या कृतीवर घानाचे लोक प्रचंड संतापले होते. यानंतर लोकांनी अभिनेत्रीवर गुन्हा दाखल केला.

तीन महिन्यांची शिक्षा

गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टाने अभिनेत्रीला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. कोर्टाने महिलेवर घरगुती हिंसाचार आणि इंटरनेटवर अश्लील फोटो पोस्ट केल्याचा आरोप केला आहे. आता या महिलेची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice Presidential Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती निवडणुकीवर आता आणखी एका पक्षाने टाकला बहिष्कार अन् कारणही सांगितलं!

Nepal PM KP Sharma Oli : नेपाळच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा! ; 'पंतप्रधानपद गेलं तरी बेहत्तर, सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही'

UPI पेमेंटला नवे पर्याय! GramPay आणि Viyona Pay लॉन्चसाठी सज्ज, अखेर मान्यता मिळाली

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Asia Cup 2025: अजिंक्य रहाणे म्हणतोय, भारतीय संघाच्या 'या' खेळाडूला हलक्यात घेऊ नका, ठरू शकतो हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT