Aryana Sayeed Sakal
ग्लोबल

अफगाणी पॉप स्टार म्हणते, भारत सच्चा मित्र

तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काबूलमधून निसटण्यात आर्याना यशस्वी ठरली. तिने एका अज्ञात ठिकाणावरून ‘एएनआय'' या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - तालिबानला (Taliban) पाकिस्तानची (Pakistan) फूस असल्याचा आरोप करताना अफगाणिस्तानची प्रसिद्ध पॉप स्टार आर्याना सयीद (Afghan Pop Star Aryana Sayeed) हिने भारत (India) हा सच्चा मित्र (Friend) असल्याची भावना व्यक्त केली आहे.

तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काबूलमधून निसटण्यात आर्याना यशस्वी ठरली. तिने एका अज्ञात ठिकाणावरून ‘एएनआय'' या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या संकटाच्या काळात अफगाणींना मदत करण्यासाठी भारत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची तिने प्रशंसा केली.

ती म्हणाली की, अफगाणिस्तानच्यावतीने मी भारताविषयी सर्वोच्च कृतज्ञता व्यक्त करते. मला तुमचे आभार मानायचे आहेत. शेजाऱ्यांमध्ये भारताच्या रूपाने केवळ एकच चांगला मित्र असल्याचे इतक्या वर्षांत आमच्या लक्षात आले आहे.

पाकला धारेवर धरताना ती म्हणाली की, तालिबानी दहशतवाद्यांना पाककडून सूचना आणि प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे तळ पाकिस्तानात आहेत.

जगाला आवाहन

आर्यानाने जगाला आवाहनही केले. ती म्हणाली की, आंतरराष्ट्रीय समुदाय सर्वप्रथम पाकचा निधी रोखेल अशी मला आशा आहे. तालिबानला पैसा पुरविण्यासाठी पाकला निधी देऊ करू नये. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र बसून अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी तोडगा शोधावा. त्यांनी पाकवर दबाव आणावा. अफगाणिस्तानमधील या सर्व समस्यांचा त्यांना पाकमुळेच सामना करावा लागत असल्याचे माझे ठाम मत आहे.

स्टेडियममध्ये कार्यक्रम

आर्याना ३६ वर्षांची आहे. ती गीतकार सुद्धा आहे. २०१५ मध्ये प्रकाशझोतात आली. एका स्टेडियममध्ये ती गायिली. त्यावेळी तिने तीन कलंक पुसून टाकल्याची प्रतिक्रिया एका मानवी हक्क कार्यकर्त्याने व्यक्त केली होती. एक महिला म्हणून तिने गायन केले. तिने हिजाब घातला नव्हता. एक महिला म्हणून तिने स्टेडियममध्ये प्रवेश केला. तालिबानची या तिन्ही गोष्टींना मनाई आहे.

आमच्याशी भारत नेहमीच चांगला राहिला आहे. भारत हा खरा, नेहमी मदत करणारा, आमच्या लोकांशी, अगदी निर्वासितांशी सुद्धा दयाळूपणे वागणारा मित्र ठरला आहे. यापूर्वी भारतात गेलेल्या अफगाण नागरिकांनी या देशाबद्दल, तेथील जनतेबद्दल नेहमीच भरभरून कौतुकाचे उद्गार काढले आहेत. आम्ही भारताविषयी कृतज्ञ आहोत.

मी नक्कीच पाकला दोष देईन. कित्येक वर्षांपासून तालिबान्यांना पाक बळ देत आहेत. तसे पुरावे, व्हिडिओ आपण पाहिले आहेत. आमचे सरकार दरवेळी तालिबान्यांना हात लावते तेव्हा ओळख पटविली जाते आणि त्यांना दिसतो तो पाकिस्तानी व्यक्ती. त्यामुळेच मी पाकला दोष देणे स्वाभाविक आहे. पाक यापुढे अफगाणिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप करणार नाही अशी मला आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT