Afghanistan esakal
ग्लोबल

Afghanistan: मदरशात नमाज पार पडली अन् काही क्षणांतच भीषण बॉम्बस्फोट; स्फोटात...

स्फोट दुपारच्या नमाजनंतर झाला

रुपेश नामदास

Afghanistan: अफगाणिस्तानच्या समंगन प्रांतातील ऐबक शहरातील जाहदिया मदरशात बुधवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले. हा स्फोट दुपारच्या नमाजनंतर झाला, ही माहिती अफगाण मीडिया गटाने प्रांतीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे.

तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर अफगाणिस्तानमधील एका मदरशात झालेल्या बॉम्बस्फोटात किमान दहा विद्यार्थी ठार झाले आहेत. या स्फोटाबाबत सुरक्षा अधिकार्‍यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. स्फोटानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: Uday Samant on Projects: आश्वासन नाही वचन! राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक आणणार - उदय सामंत

हेही वाचा- भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

15 ऑगस्ट 2021 पासून अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबान सातत्याने देशात शांतता प्रस्थापित करण्याचा दावा करत आहे, परंतु हल्ल्यांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये मोर्टार शेलचा स्फोट झाला होता. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकृत निवेदनानुसार हा स्फोट दहशतवादी हल्ला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT