ग्लोबल

VIDEO : तालिबानींची दहशत, नागरिकांचा विमानाला लटकून प्रवास

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानमध्ये विमानतळांवर गर्दी झाली असून चेंगराचेंगरीची परिस्थिती आहे. यात आता एक धक्कादायक असा व्हिडिओ समोर येत आहे.

काबुल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तिथली परिस्थिती भीषण अशी झाली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरीक लवकरात लवकर देशातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. अफगाणिस्तानमध्ये विमानतळांवर गर्दी झाली असून चेंगराचेंगरीची परिस्थिती आहे. यात आता एक धक्कादायक असा व्हिडिओ समोर येत आहे. यामध्ये लोक विमानाला लटकून जाताना दिसतात. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तानमधून बाहेर जाणाऱ्या सी 17 विमानाला नागरीक लटकून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यात एका विमानाला लटकून जात असलेले काही जण विमानाने उड्डाण केल्यानंतर पुढच्या काही मिनिटात खाली पडताना दिसले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर एका पत्रकाराने शेअर केला आहे. तिघांपैकी दोन जण रहिवाशी भागात पडले आहेत.

अस्वाका न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, काबुल एअरपोर्टजवळ स्थानिक लोकांनी असा दावा केला की, एका विमानाच्या टायर्सला पकडून तीन जण बसले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर तीन तरुण हवेतून खाली पडले. या नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचं समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT