History of Afghan Sikhs Team eSakal
ग्लोबल

'त्या' घटनेनंतर ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते...

अफगाणिस्तानमधील शिखांचा इतिहास...

सुधीर काकडे

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानने पुन्हा ताबा मिळवल्यानंतर देशातील अनेक नागरिकांनी तालिबान्यांच्या (Taliban) जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडणे पसंत केले. देश सोडणाऱ्या या नागरिकांमध्ये अफगाणिस्तानच्या मुस्लिम नागरिकांसह शीख धर्मीयांचा देखील समावेश होता. देशातील अनेक हिंदू आणि शीख (Sikhs) नागरिकांनी या परिस्थितीत अफगाणिस्तान सोडत असताना मिळेल त्या देशात जाण्याचा प्रयत्न केला. यातील बहूतांश अफगाणी शीख भारतात आले. भारताने (India) या संकटाच्या काळात देशात येणाऱ्या या अफगाणी शीख नागिरिकांना देशात आश्रय दिला.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापर्यंत भारतीय नागरिकांव्यतिरिक्त अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंसह 550 हून अधिक लोकांना अफगाणिस्तानातमधून बाहेर काढण्यात आले. 'शीख समुदायाचा हा अफगाणिस्तानमधला शेवट असला तरी भारत ही त्यांच्यासाठी नवी सुरुवात आहे', असे वक्तव्य शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष परमजीत सिंग यांनी केले होते. अफगाणिस्तानमध्ये शीख धर्माचे अस्तित्व आता हळू हळू संपुष्टात येताना दिसते आहे. याच पार्श्वभुमीवर शीख समुदायाचा अफगाणिस्तानमधल्या इतिहास जाणून घेऊ.

अफगाणिस्तानमधील शीखांचा इतिहास...

अफगाणिस्तानात शीख धर्माचे वास्तव हे पंधराव्या शतकापासून असल्याचे दिसून येते. शीख धर्माच्या स्थापनेपासूनच शीख लोकांचे या ठिकाणी वास्तव्य असल्याची माहिती मानववंशशास्त्रज्ञ आणि दक्षिण आशियाई अभ्यासाचे अभ्यासक रॉबर्ट बॅलार्ड यांनी दिली आहे. बॅलार्ड यांच्यामते अफगाणिस्तानातील हे शीख त्या अफगाणि खत्री समाजातून येतात ज्यांनी नवव्या आणि तेराव्या शतकात बुद्ध आणि इस्लाम धर्म स्विकारण्यास नकार दिला होता.

Afghan Sikhs

१६ व्या आणि १८ व्या शतकापासून शीखांच्या वास्तव्याच्या खुणा आढळून येतात. १५०४ मध्ये मुघल सम्राट बाबरने काबूल ताब्यात घेतल्यानंतर लिहीलेल्या आत्मचरित्र 'बाबरनामा'मध्ये तत्कालीन हिंदुस्थानी लोकांच्या लोकसंख्येबद्दल लिहीताना काबूलमध्ये हिंदुस्थानी लोकांची स्वत:ची बाजारपेठ असल्याचा उल्लेख बाबरने केलेला आढळतो.

शीख साम्राज्याचे पहिले राजा महाराजा रणजीत सिंग यांनी आग्नेय भारताच्या उपखंडावर राज्य केले होते. 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अफगाण प्रदेशावर आपली सत्ता निर्माण केली होती. अल्पकाळ टिकलेल्या या साम्राज्याचा १८४९ साली ब्रिटीशांबरोबर झालेल्या युद्धात पाडाव झाला. यावेळची एक महत्वाची बाब म्हणजे या युद्धात शीखांना अफगाणिस्तानचा पाठींबा होता. यावरुन शीख धर्माचे तिथले अस्तित्व दिसून येते.

शीखांनी अफगाणिस्तान कधी व का सोडले?

अफगाणिस्तानातून शीखांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराला सुरुवात झाली ती अब्दुर रहमान खानच्या कारकिर्दीत. त्यावेळी मुळ अफगाणि लोकांनी अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख धर्मीयांना त्रास दिल्याचे सांगितले जाते. याकाळातच अफगाणिस्तानमधून मोठ्या संख्येने बाहेर पडलेला हा शीख समुदाय भारताकडे आला. भारतात आल्यानंतर पंजाबमधील पटियालामध्ये शीख समुदायाने आपली वस्ती स्थापन केली.

दुसऱ्या टप्प्यातील स्थलांतराला कारणीभूत ठरला मुजाहिद्दीनचा उदय. या काळात मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानी नागरिकांनी देश सोडला. १९८८ मध्ये जलालाबादमधील गुरु नाणक दरबारमध्ये दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले होते. या घटनेत १३ शीख नागरिकांचा मृत्यू झाला. पुढे वर्षभरात झालेल्या हल्ल्यांच्या मालिकेत १०० पेक्षा जास्त शीख नागरिक मारले गेले. या घटनेनंतर अफगाणिस्तानातील जवळपास ६५००० लोकांनी स्थलांतर केले आणि ते भारतात आले. रॉ़यटर्सच्या एका अहवालानूसार १८८० नंतरच्या कालखंडात तब्बल ५ लाख शीखांनी अफगाणिस्तान सोडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT