Drugs
Drugs esakal
ग्लोबल

अफगाणिस्तानात कुत्र्यांना चारली जाताहेत ड्रग्ज, हेरॉईन

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून सर्वसामान्यांचं जगणं अत्यंत कठीण झालंय; पण आता..

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यापासून सर्वसामान्यांचं जगणं अत्यंत कठीण झालंय. पण, आता तिथल्या कुत्र्यांचेही (Dogs) वाईट दिवस सुरू झाल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून काही धक्कादायक फोटो समोर आली आहेत. ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. येथील लोक कुत्र्यांना ड्रग्ज (Drugs) आणि हेरॉईन देताना दिसत आहेत. एवढंच नाही, तर ते अनेकवेळा कुत्र्यांना अंमली पदार्थांचं सेवन करण्यास भाग पाडत आहेत.

अफगाणिस्तानची राजधानी काबूल (Kabul) येथून ही घटना समोर आलीय. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, येथील कुत्र्यांनाही अंमली पदार्थ दिले जात आहेत. त्यामुळं त्यांची प्रकृती गंभीर होत आहे. यामागचं कारणही आता समोर आलंय. ते खूपच धक्कादायक आहे. कडाक्याच्या थंडीत स्वत:ला उबदार ठेवण्यासाठी लोकांकडं कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याचे येथील नागरिक सांगताहेत. अशा स्थितीत लोक ड्रग्ज घेऊन स्वतःहून उंच राहत असून शरीराच्या उष्णतेसाठी ते कुत्र्यांना स्वतः जवळ झोपवत आहेत.

अफगाणिस्तानातील काही भागात ड्रग्ज आणि हेरॉईन अतिशय स्वस्तात मिळतात, त्यामुळं भिकारी आणि बेघर लोकही ते विकत घेऊ शकतात, असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. शहरात हेरॉईनच्या नशेत लोक आढळून येत असून ते रिकाम्या बाटल्यांमधून भटक्या कुत्र्यांना अंमली पदार्थ देत ​​आहेत. ड्रग्ज घेतल्यानंतर, इकडं-तिकडं फिरणारी कुत्री शांत होतात आणि एका जागी शांत बसतात, असंही स्पष्ट झालंय. एकीकडं तालिबान ड्रग्ज संपवण्याची भाषे करते, तर दुसरीकडे कुत्र्यांना ड्रग्ज देताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT