Afghanistan Explosion in a van returning from a wedding ceremony 10 members of the same family died 
ग्लोबल

अफगाणिस्तान : लग्न समारंभावरुन परतणाऱ्या व्हॅनमध्ये स्फोट; एकाच कुटुंबातील १० व्यक्तींचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

लग्न समारंभ उरकून घराकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या व्हॅनमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना दक्षिण अफगाणिस्तानात घडली असून यामध्ये एकाच कुटुंबातील १० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. स्फोटानंतर वाहनाला आग लागल्याने यातील प्रवाशांचा होरपळून मूत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.  

दक्षिण प्रातांतील पोलीस प्रवक्ते अहमद शाह साहेल यांनी या स्फोटाबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, "एक कुटुंब लग्न समारंभ उरकून मिनी व्हॅनमधून घरी परतत होतं. हेलमंड नदीच्या किनाऱ्याच्या रस्त्याने जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने त्यांची व्हॅन नदीपात्रात पडली. नदीमध्ये पडल्यानंतर व्हॅन जवळपास पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. त्यामुळे या व्हॅनमधील लोकांना पाण्याबाहेर काढताना अडचणी येत होत्या. दरम्यान, उच्च दाब आणि इंजिनमध्ये पाणी शिरल्याने इंजिनचा स्फोट झाला. स्फोटामुळे  व्हॅनच्या आतमध्ये आग लागली त्यातील सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, वधू आणि वर हे देघे दुसऱ्या कारमधून प्रवास करत असल्याने ते सुरक्षित आहेत."  ही घटना अशा भागात घडली आहे जिथे दहशतवादी आणि अफगाण सुरक्षा रक्षक सक्रिय असल्याने या घटनेनंतर पोलीस तात्काळ मदत उपलब्ध करु शकले नाहीत, असं दुसऱ्या एका पोलीस प्रवक्त्याने म्हटलं आहे. 

दुसऱ्या एका घटनेत पत्रकाराची गोळी घालून हत्या

दरम्यान, इथल्या दुसऱ्या एका घटनेत उत्तर अफगाणिस्तानात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी बघलान पत्रकार संघाचे माजी प्रमुख डॉ. खलील मार्मगो यांची गोळी मारुन हत्या केली आहे. बघलानच्या एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, नार्मगो मंगळवारी बघलान प्रांताच्या राजधानीत परतत होते. तेव्हा अज्ञात बंदुकधाऱ्यांनी त्यांची कार अडवली आणि त्यांना कारमधून ओढून बाहेर काढत त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेची कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप जबाबदारी घेतलेली नाही. 

India भारत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT