xi jinping file photo
ग्लोबल

अफगाणिस्तान दहशतवादाचा अड्डा होणार नाही; चीनला तालिबानकडून अपेक्षा

विनायक होगाडे

न्यूयॉर्क : अफगाणिस्तान हा देश पुन्हा दहशतवादाचा अड्डा बनता कामा नये असा इशारा चीनने तालिबानला दिला आहे. संयुक्त राष्ट्रेच्या (यूएन) सुरक्षा परिषदेच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत चीनचे उपप्रतिनिधी गेंग शुआंग यांनी याविषयी परखड भाष्य केले. ते म्हणाले की, अफगाणिस्तानात दहशतवाद पोसला जाता कामा नये हाच निर्णायक मुद्दा असेल. अफगाणिस्तानमध्ये भविष्यात कोणताही राजकीय तोडगा काढताना याविषयी ठाम राहावेच लागेल. तालिबान त्यांच्या आश्वासनांवर ठाम राहिली आणि त्याची कळकळीने पूर्तता करेल आणि दहशतवादी संघटनांबरोबर स्पष्टपणे फारकत घेईल अशी अपेक्षा आहे. तालिबान खुले आणि सर्वसमावेशक इस्लामी सरकार स्थापन करेल अशीही आशा आहे.

अनागोंदीचा गैरफायदा नको

अफगाणिस्तानात अनागोंदी निर्माण झाल्यामुळे त्याचा गैरफायदा उठविण्यासाठी इस्लामिक स्टेट (आयएस), अल््-कायदा आणि इटीआयएम (पूर्व तुर्किस्तान इस्लामी चळवळ) अशा संघटना प्रयत्न करतील, असे नमूद करून शुआंग यांनी सांगितले की, या संघटनांना रोखण्यासाठी खंबीर कृतीची गरज आहे. त्यासाठी सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांबाबत बंधनकारक असलेल्या करारांची पुर्तता करावी.

याआधी शेजारच्या चीनने तालिबानबद्दल अनुकूल भूमिका घेतली आहे. चीनने तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "आम्ही अफगाणि जनतेच्या अधिकारांचा आदर करतो. अफगाणिस्तानसोबत मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध विकसित करण्याची आमची इच्छा आहे" असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT