After 9 years, Prime Minister Narendra Modi on his visit to Australia  
ग्लोबल

PM Modi: तब्बल नऊ वर्षांनी ऑस्ट्रेलिया दौरा; ऑस्ट्रेलिया नेत्यांकडून PM मोदींवर कौतुकाचा वर्षाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत.

धनश्री ओतारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. तब्बल नऊ वर्षांनी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियनसुपरचे सीईओ आणि हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या कार्यकारी अध्यक्ष गीना राइनहार्ट यांची भेट घेतली. या भेटीनंतर या ऑस्ट्रेलिया नेत्यांची पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षावर केला आहे. (After 9 years, Prime Minister Narendra Modi on his visit to Australia )

मोदी 2014 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. सिडनीत आल्यावर भारतीय समुदायाकडून पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियनसुपरचे सीईओ पॉल श्रोडर आणि हॅनकॉक प्रॉस्पेक्टिंगच्या कार्यकारी अध्यक्ष गीना राइनहार्ट यांची भेट घेतली.

या भेटीनंतर पॉल श्रोडर आणि गीना राइनहार्ट यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आमची बैठक सर्वात प्रभावी होती. पंतप्रधान मोदी हे एक अतिशय प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांना व्यवसाय समजतो ते खुप उत्साही आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी भेटीवेळी भारताबद्दलच्या त्यांच्या स्वप्नांबद्दल आणि त्यांच्या नैतिकतेबद्दल बोलले. त्यांच्या बोलण्यात एक वेगळी चमक होती. शक्तिशाली संदेश होता. ऑस्ट्रेलियनसुपरने भारतात गुंतवणूक अकेली आहे आणि आम्हाला भारतात गुंतवणूक करण्याचा उत्तम अनुभव आहे. अशी प्रतिक्रिया श्रोडर यांनी मोदींच्या भेटीनंतर दिली.

ऑस्ट्रेलियनसुपरला भारतासोबत भागीदारी करण्यासाठी आमंत्रित केले. अशी माहितीही विदेश मंत्रालयाने दिली आहे.

तर गीना राइनहार्ट काय म्हणाल्या?

आपल्या दोन्ही देशांची क्षमता खूप मोठी आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत, तुमची अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन (USD) पर्यंत वाढली आहे आणि पुढील 25 वर्षांची योजना 32 ट्रिलियन (USD) पर्यंत वाढण्याची आहे. तर, अलीकडे वाढ प्रचंड आहे. भविष्यातील वाढ खूप मोठी होणार आहे. ऑस्ट्रेलियाला भारतासोबतचे संबंध विकसित करण्यासाठी खरोखरच कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. अशी भावना गीना राइनहार्ट यांनी व्यक्ती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT