ग्लोबल

PM पदावरून पायउतार झाल्यानंतर इम्रान खान यांची पेशावरमध्ये पहिली रॅली

पाकिस्तानातील सत्ता परिवर्तनानंतर इम्रान खान यांची ही पहिलीच सभा असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानात इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. मात्र त्यापूर्वी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनी पाकिस्तानचे राजकारण ढवळून निघाले होते. दरम्यान, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान आज पेशावरमध्ये रॅली घेणार आहेत. पाकिस्तानातील सत्ता परिवर्तनानंतर इम्रान खान यांची ही पहिलीच सभा असणार आहे. इम्रान खान यांनी ट्विट करत आज (बुधवार) मी पेशावरमध्ये जलसा (Rally) आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यात ते म्हणतात, या रॅलीला पार्टीतील सर्व लोकांनी यावे अशी माझी इच्छा आहे. कारण पाकिस्तानची निर्मिती परकीय शक्तींची कठपुतली म्हणून नव्हे तर एक स्वतंत्र, सार्वभौम राज्य म्हणून झाली आहे. आम्ही तात्काळ निवडणुकांची मागणी करत आहोत कारण हा एकच मार्ग आहे. निष्पक्ष आणि मुक्त निवडणुकांद्वारे, लोकांना त्यांचा पंतप्रधान कोण हवा आहे हे ठरवू द्या, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, इम्रान खान यांनी मंगळवारी देशातील नागरिकांना सार्वत्रिक निवडणुकांची मागणी करण्याचे आवाहन केले. पीटीआय नेत्याने असेही म्हटले की, कोणतेही सैन्य किंवा परदेशी संस्था आपल्या देशाचे रक्षण करू शकत नाही, केवळ पाकिस्तानच स्वतःचे रक्षण करू शकते यावर जोर दिला. इम्रान खान यांचा राजकीय पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने पेशावरच्या रॅलीपूर्वी माजी पंतप्रधानांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणाले की ते रॅलीत लोकांना संबोधित करतील आणि त्यांना सत्तेपासून दूर करणाऱ्या मोठ्या षड्यंत्राबद्दल बोलतील.

8 मार्च रोजी इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांच्या अनुपस्थितीत सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांनी 70 वर्षीय शाहबाज यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT