Amritpal Singh Khalistani Sakal
ग्लोबल

Amritpal Singh : भारतीय ध्वजाच्या अवमानानंतर आता खलिस्तान्यांकडून अमेरिकेतील दूतावासाची तोडफोड

दोन्ही घटनांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

खलिस्तानी समर्थकांनी लंडनमध्ये भारतीय ध्वज खाली खेचल्यानंतर आता अमेरिकेतही एक प्रकार घडला आहे. सॅन फ्रान्सिस्को इथल्या भारताच्या उच्चायुक्त कार्यालयात खलिस्तानी समर्थकांनी तोडफोड केली आहे. या घटनेचा भारत सरकारने निषेध केला आहे.

संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही सरकारने केली असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. बागची यांनी याबाबत एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

नवी दिल्ली इथं अमेरिकेच्या प्रभारींसोबत झालेल्या बैठकीत भारताने सॅन फ्रान्सिस्को इथं उच्चायुक्त कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. तसंच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

खलिस्तान समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्को इथल्या भारताच्या उच्चायुक्त कार्यालयात तोडफोड केली आहे. अमृतपाल सिंग प्रकरणाचे पडसाद देशाबाहेरही उमटू लागले आहे. लंडनमध्येही भारतीय दूतावासावरील तिरंगा खाली उतरवण्याचे प्रयत्न झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : गोकुळमधील अदृष्य शक्तीला पुन्हा दणका, ४९२ दूध संस्थांना मतदानाचा अधिकार कायम

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

SCROLL FOR NEXT