microsoft windows crash esakal
ग्लोबल

Microsoft Windows Crash : एक अपडेट अन् जगभर राडा, ‘क्राउडस्ट्राईक’ने सांगितलं सोल्यूशन, रशियन हॅकरवर संशय?

जगभरातील ‘मायक्रोसॉफ्ट-३६५’ ची सेवा ठप्प झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. याला ‘क्राउडस्ट्राईक’ने केलेले अपडेट कारणीभूत ठरले आहे. या फर्मचे कॉन्फिग्रेशन चुकल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सायबर अभ्यासकांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जगभरातील ‘मायक्रोसॉफ्ट-३६५’ ची सेवा ठप्प झाल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. याला ‘क्राउडस्ट्राईक’ने केलेले अपडेट कारणीभूत ठरले आहे. या फर्मचे कॉन्फिग्रेशन चुकल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सायबर अभ्यासकांनी सांगितले. याची जबर आर्थिक किंमत या फर्मलाही चुकवावी लागणार आहे. ‘क्राउडस्ट्राईक’ ही सायबर सिक्युरिटी फर्म असून जी मायक्रोसॉफ्टसोबत काम करते.

आयटी क्षेत्रातील कंपन्यांना अधिक सुरक्षितपणे काम करता यावे यासाठी वातावरण निर्मिती करण्याचे काम या फर्मकडून करण्यात येते. थोडक्यात या कंपन्यांना हॅकरपासून सुरक्षित ठेवण्याचे काम या फर्मद्वारे केले जाते. हॅकर, सायबर हल्ले, रॅनसमवेअर आणि डेटा लीक या समस्यांपासून कंपन्यांचा बचाव करण्याची जबाबदारी या फर्मकडे आहे. जगातील अनेक बड्या बँका, विद्यापीठे आणि सरकारी तपाससंस्था देखील या फर्मच्या ग्राहक आहेत. मागील काही दिवसांमध्ये विविध कंपन्यांवरील सायबर हल्ले वाढल्याने या फर्मचे महत्त्व देखील वाढल्याचे दिसून येते.

हल्ल्याची रिअल टाइम माहिती देणारे फाल्कन

या कंपनीने तयार केलेले ‘क्राउडस्ट्राईक फाल्कन’ हे उत्पादन सायबर वर्तुळामध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. त्यामुळे यूजरला रिअल टाईम सायबर हल्ल्यांची माहिती मिळते. ‘हायपर अॅक्युरेट डिटेक्शन’ आणि ‘ऑटोमॅटिक प्रोटेक्शन’ देखील त्याच्यामुळे मिळते. हजारो कंपन्या त्याचा वापर करतात. जगभरातील मायक्रोसॉफ्टची सेवा डाउन झाल्यानंतर ‘क्राउडस्ट्राईक’ची फाल्कन प्रणाली चर्चेत आली.

कंपनीचा कुणी मालक नाही

‘मॅकअॅफी’ कंपनीचा माजी कर्मचारी जॉर्ज कुर्तझ याने २०१२ मध्ये या कंपनीची स्थापना केली पण सध्या या कंपनीचा कुणीही एक मालक नाही. अनेक गुंतवणूकदार आणि संस्था यांनी एकत्रित येऊन यामध्ये गुंतवणूक केली आहे. यातील ४० टक्के गुंतवणूक ही संस्थात्मक असून ५७ टक्के समभाग पब्लिक कंपनी आणि वैयक्तिक गुंतवणूकदार यांच्याकडे आहे. ‘व्हॅनगार्ड’ या समूहाकडे या कंपनीचे ६.७९ टक्के एवढे समभाग आहेत.

रशियन हॅकरवर संशय?

मायक्रोसॉफ्टच्या नेटवर्कवर तीन महिन्यांपूर्वीच एक मोठा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे रशियन गुप्तचरसंस्थांचा हात असल्याची बाब उघड झाली होती. या हॅकरने कॉर्पोरेट मेलवर डल्ला मारला होता आणि त्यामाध्यमातून प्रणालीच हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. आता देखील मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामागे सायबर चोरट्यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

काय आहे ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’

मायक्रोसॉफ्टचे नेटवर्क जॅम झाल्यानंतर स्क्रीनवर अवतरलेला ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’चा (बीएसओडी) मेसेज सायबर विश्वामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ‘बीएसओडी’ हा क्रिटिकल एरर स्क्रीन आहे, जो विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर पाहायला मिळतो. संबंधित सिस्टिम एखाद्या गंभीर समस्येमुळे जेव्हा क्रॅश होते तेव्हा त्यामुळे तिच्या कामकाजात अडथळा येतो. संगणकीय प्रणालीमध्ये ही एरर आल्यानंतर संगणक आपोआप रिस्टार्ट होते. अशा परिस्थितीत जो डेटा सेव्ह केलेला नाही तो डिलिट होण्याचा धोका असतो. हार्डवेअर फेल्युअर किंवा सॉफ्टवेअरमधील समस्येमुळे ही स्थिती निर्माण होते. रॅम, हार्ड-ड्राइव्ह, ग्राफीक्स कार्ड किंवा पॉवर सप्लाय युनिटमुळे ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’ची समस्या निर्माण होऊ शकते.

ब्रिटनमध्ये विमानसेवेला फटका, रेल्वेही थांबली

मायक्रोसॉफ्ट सर्व्हिस विंडो तडकल्यानंतर त्याचे मोठे परिणाम ब्रिटनमध्ये पाहायला मिळाले. याचा फटका रेल्वे आणि विमानसेवेला बसला. ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ची सेवा देखील त्यामुळे बाधित झाली. लंडनमधील सर्वांत मोठ्या हिथ्रो विमानतळावरील विमानसेवेमध्ये त्यामुळे व्यत्यय आला होता. गॅटविक विमानतळावर देखील प्रवाशांच्या रांगा पाहायला मिळाल्या. ‘लंडन स्टॉक एक्सचेंज’मधील सेवा यामुळे बाधित झाली. सध्या ‘आरएनएस’ सेवेशी संबंधित तांत्रिक बिघाड दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती सूत्रांनी दिली. ब्रिटनमधील रेल्वेसेवेचे नेटवर्क सांभाळणाऱ्या ‘नॅशनल रेल’ने आम्ही या समस्येचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत असे म्हटले आहे.

‘क्राउडस्ट्राईक’चे सोल्यूशन

  • सेफ मोड किंवा WRE मध्ये विंडोज बूट करा

  • C:\Windows\System32\drivers\CrowdStrike वर जा

  • C-०००००291*.sys शी जुळणारी फाइल शोधा आणि हटवा

  • सामान्यपणे बूट करा.

या देशांत सर्वाधिक परिणाम

-अमेरिका - ब्रिटन - जर्मनी

- सिंगापूर - फ्रान्स -स्कॉटलंड

-ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड

भारतात या कंपन्यांना फटका

- इंडिगो -स्पाइसजेट -अकासा

मायक्रोसॉप्टचा वापर कशात?

  • व्यवस्थापन प्रणाली

  • अनुभव शेअर करणारी प्रणाली

  • सुरक्षा आणि देखरेख

  • डेटा ॲनालिटिक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT