ग्लोबल

युद्धाचा परिणाम; रशियामध्ये घरभाड्याएवढ्या McDonald’s बर्गरच्या किंमती

सकाळ डिजिटल टीम

फास्ट फूडची मोठी कंपनी मॅकडोनाल्ड(McDonalds) ने घोषणा केली की, रशियामध्ये आपले सर्व ८५० रेस्टॉरंटला अस्थायी स्वरुपामध्ये बंद करत आहे. लोकांनी मॅकडोनाल्डच्या बर्गरची शेवटची चव चाखण्यासाठी(last Bite) लोकांनी आउटलेट बाहेर गर्दी केली आहे. गोल्डन आर्चेसच्या बाहेर कित्येक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन व्हायरल होत आहे. मॅकडोनाल्ड आऊटलेटवर लोकांना अशीच गर्दी केली आहे की, जणू McDonald’s बर्गर शेवटची चव चाखणार आहे. लोकांची तोबा गर्दी पाहण्यासारखी आहे.

बर्गरच्या किंमती एवढं दिल्ली-नोएडामध्ये राहण्यासाठी भाडं दिलं जाते.

तुम्ही एक म्हण ऐकली असेल की, 'आपत्तीत संधी' ज्याचा अर्थ आहे की, समस्येला आपण चिंता न करता त्याला संधीमध्ये बदलणे. असेच काहीसे रशियाच्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. ऑनलाईन बर्गर विकणारे अॅप व वेबसाईट्सवर अशी लूट सुरु आहे की ज्याबाबत कोणी विचारही करू शकत नाही. एका महिन्यामध्ये तुम्हाला जितके भाडे भरावे लागते, त्याएवढे किंवा त्यापेक्षा जास्त पैसे देऊन लोक मॅकडोनाल्ड्सचे बर्गर खाण्यासाठी तयार आहे. दोन-तीन बर्गरची किंमत नौएडा-दिल्ली सारख्या शहरांमध्ये २-३ बीएचकेच्या फ्लॅटच्या भाड्याएवढी आहे.

हजारो रुपयांमध्ये विकला जातोय MCdonald's बर्गर

फोटोमध्ये दिसत आहे की, तीन किंवा चार बर्गर २६००० रुपये (किंवा ४०,००० रुबल) मध्ये विकले जात आहे तर निनावी वस्तू सिलबंद बॅगेमध्ये ३३४०० रुपये( ५०,००० रुबलेपेक्षा जास्त अधिक आहे. तसेच कोका-कोलाचा एक ऑर्डर साधारण १००० रुपये (किंवा १५०० रुबल) मध्ये उपलब्ध होत आहे.

मॅकडोनाल्डस जगातील प्रमुख फूड अॅन्ड ड्रिंक्स कंपन्यापैकी एक आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिनच्या इशाऱ्यावर यूक्रेनवर आक्रमण केल्यानंतर संचलन सुरु ठेवण्यासाठी मॅकडॉनल्डसवर नियम लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT