air india express plane passengers evacuated after smoke and fire muscat to cochin flight  
ग्लोबल

मस्कतहून कोचीला निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला आग

सकाळ डिजिटल टीम

ओमानची राजधानी मस्कत येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून अचानक धूर निघू लागल्याचा प्रकार समोर आला. बुधवारी कोचीनला जाणार्‍या एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट IX 442 च्या इंजिन क्रमांक 2 मध्ये आग लागून धूर निघू लागल्याने 140 हून अधिक प्रवाशांना बाहेर काढावे लागले.

ओमानमधील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात सुमारे 14 लोक जखमी झाले आहेत. प्रवाशांच्या विमानातून धूर निघू लागल्याने स्लाइडवर एअर इंडिया एक्सप्रेस विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान बुधवारी सकाळी कोचीला रवाना होणार होते पण त्यापूर्वीच हा अपघात झाला.

एका अधिकाऱ्याने सांगितले, VT AXZ म्हणून रजिस्टर्ड विमान B737-800, मस्कतमध्ये उड्डाणासाठी तयार होते, मात्र त्यामधून धूर आणि इंजिन क्रमांक 2 ला आग लागल्याचे आढळून आले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवासी (141+4 लहान मुलांना) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना टर्मिनल इमारतीत नेण्यात आले आणि त्यांना परत घेऊन जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

एअर इंडिया एक्स्प्रेसचे मस्कत-कोची विमान उड्डाणाच्या वेळी धावपट्टीवर असताना त्यात धूर निघताना आढळून आले. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना स्लाइडच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. विमानात 141 प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. सर्वांना बाहेर काढण्यात आले व ते सर्व सुरक्षित आहेत.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एका निवेदनात, प्रवाशांसाठी दुसरे विमान उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती दिली. डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA)चे महासंचालक अरुण कुमार म्हणाले की या प्रकरणाची आम्ही चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू असे सांगितले. विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी इंजिनला आग लागल्याची माहिती दिली, त्यानंतर सर्व आवश्यक कारवाई करण्यात आली आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी टॅक्सीवेवर स्लाइड्स तैनात करण्यात आल्या होत्या

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी कालिकतहून दुबईला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान जळण्याच्या वासाने मस्कतला वळवावे लागले होते. मात्र, नंतर कोणतीही गंभीर प्रकार समोर आला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT