Ajit Doval Sakal
ग्लोबल

‘लष्करे’, ‘जैश’विरुद्ध कारवाई; दोवाल यांचा प्रस्ताव

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) व्यासपीठावर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला.

सकाळ वृत्तसेवा

दुशान्बे (ताजिकिस्तान) - शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) (SCO) व्यासपीठावर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल (Ajit Doval) यांनी महत्त्वपूर्ण प्रस्ताव (Proposal) मांडला. पाकस्थित लष्कर-ए-तैबा, (Lashkar E Taiba) जैश-ए-महंमद (Jaish E Mohammed) या दहशतवादी गटांविरुद्ध (Terrorist Group) कृती योजना राबवावी असे त्यांनी म्हटले आहे. (Dowal Proposal Action Against Lashkar Jaish)

सदस्य देशांच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्यांसह दोवाल यांची बैठक झाली. त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ हे सुद्धा उपस्थित होते.

दोवाल यांनी बैठकीत सांगितले की, शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी ड्रोनसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादी करीत आहेत. त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहेत. डार्क वेब (सर्च इंजिनला न मिळणारा ऑनलाइन मजकूर), कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय-आर्टिफिशियल इंटेलिजन्स), ब्लॉकचेन आणि सोशल मीडिया अशा माध्यमांचाही गैरवापर केला जात आहे. दहशतवाद पोसणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांचा अवलंब होण्याची गरज आहे. त्यासाठी एससीओ आणि पॅरीसस्थित एफएटीएफ (आर्थिक कृती कार्य दल) यांच्यात समन्वय करार व्हायला हवा.

दोवाल यांचे मुद्दे

  • सर्व प्रकार आणि स्वरुपातील दहशतवाद निषेधार्ह

  • दहशतवादी गुन्हेगार, सीमेवर हल्ले करणारे गट यांना शासन होण्यासाठी शीघ्र प्रक्रिया हवी

  • संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) ठरावांची पूर्ण अंमलबजावणी व्हावी

  • यूएनने दहशतवादी ठरविलेल्या व्यक्ती आणि गटांवर निर्बंध घाला

पात्रुशेव्ह यांच्याशी चर्चा

मॉस्को : दोवाल यांनी रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाय पात्रुशेव्ह यांनी भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी पात्रुशेव्ह यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. अफगाणिस्तानमधील बदलती परिस्थिती आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील घडामोडींचा त्यांनी आढावा घेतला. तसेच, रशिया आणि भारतामधील संरक्षण सहकार्य आणि दोन्ही देशांच्या तपास संस्थांमधील सहकार्य याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली.

कोरोनानंतरच्या स्थितीवर लक्ष

यंदाच्या ‘एससीओ’ बैठकीत कोरोनानंतरच्या स्थितीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. संसर्गाचा सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून त्यामुळे दहशतवाद, कट्टरतावाद, अंमली पदार्थांचा व्यापार आणि संघटित गुन्हेगारी यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT