Pakistani Commander Sarfaraz Killed  
ग्लोबल

Al Zawahiri : 24 तासांत अल जवाहिरीच्या हत्येचा बदला, अल कायदाकडून पाकिस्तानी कमांडरची हत्या

गरीब पाकिस्तानने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वाहिरीच्या मृत्यूचा सौदा केला होता.

सकाळ डिजिटल टीम

अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी (अल-जवाहिरी) याचा अमेरिकेने खात्मा केला. दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून अमेरिकेने अल-जवाहिरीला ठार केले. दरम्यान, आपल्या नेत्याचा बदला घेण्यासाठी अल-कायदाने आयएसआयशी संबंधित असलेला पाकिस्तानी कमांडर सरफराजला त्याच्या हेलिकॉप्टरसह उडवले आहे. अल-जवाहिरीच्या हत्येत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचे समोर आल्याने अल-कायदाने हे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे. (Pakistani Commander Sarfaraz Killed)

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तालिबान आणि अल-कायदाला ही बातमी कळताच आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली होती. तेच प्रत्युत्तर म्हणून 24 तासांच्या आत पाकिस्तानचे वरिष्ठ लेफ्टनंट जनरल यांचे हेलिकॉप्टर बलुचिस्तानवर उड्डाण करण्यात आले होते. आपल्या नेत्याचा बदला घेण्यासाठी अल-कायदाने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे.

गरीब पाकिस्तानने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वाहिरीच्या मृत्यूचा सौदा केला होता. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर, अल-कायदाने त्याचा शोध लावला आणि 24 तासांच्या आत पाकिस्तानच्या सर्वात वरिष्ठ लेफ्टनंट जनरलची हत्या केली आणि जवाहिरीच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. अल कायदाच्या नेत्याच्या हत्येनंतर संपूर्ण अफगाणिस्तानात खळबळ माजली होती.

अफगाणिस्तानचा लुटियन झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेरपूरमध्ये अल कायदाचा नेता कसा मारला गेला?, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार अल-कायदाला पूर्ण पाठिंबा देत असल्याने तहलकाही निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला घरात घुसून मारल्यानंतर तालिबाननेही तपास सुरू केला आहे. अल-जवाहिरी महिनाभरापूर्वीच पाकिस्तानातून अफगाणिस्तानात गेला होता आणि त्याची माहिती पाक लष्कर आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांना होती.

दरम्यान, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा हे स्वत: अमेरिकेतील बड्या लोकांच्या संपर्कात होते आणि पाकिस्तान सरकार सातत्याने अमेरिकेला आपली स्थिती सांगून आयएमएफकडे निधीची मागणी करत होते. मात्र अमेरिकेने यावर कोणतेही उत्तर दिले नव्हते. त्यानंतर आयएसआय आणि पाकिस्तान लष्कराने संमतीने एक करार निश्चित केला होता आणि आता लवकरच पाकिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी अमेरिकेकडून निधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या या हेलिकॉप्टरमध्ये लेफ्टनंट जनरल सरफराज यांच्यासह इतर अधिकारी तैनात होते. सरफराज हा आयएसआयचा सर्वात खास मानला जातो आणि जनरल बाजवा यांच्यानंतर तोही पाकिस्तानी लष्कराचा जनरल होण्याच्या शर्यतीत सामील होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT