india china conflict russia says will supply s 400 missile next year 
ग्लोबल

भारताला रशियाकडून S-400 खरेदी करु द्या, सिनेटर्सच बायडेन यांना खास पत्र

चारशे किलोमीटरपर्यतच्या परीघांत येणारी क्षेपणास्त्र आणि पाचव्या श्रेणीतील फायटर विमानं पाडण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे.

दीनानाथ परब

वॉशिंग्टन: भारताला रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याची सवलत द्यावी. त्यांना निर्बंधांच्या माध्यमातून रोखू नका. अमेरिकेच्या (america) दोन प्रभावशाली सिनेटर्सनी (senators) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (jo biden) यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. भारताला अशी सवलत देण्यामध्येच अमेरिकेचं राष्ट्रीय हित आहे, असं या सिनेटर्सच म्हणणं आहे.

जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर या दोन सिनेटर्सनी जो बायडेन यांना पत्र लिहून भारताला 'काउंटरिंग अमेरिकाज अ‍ॅडव्हरसरिज थ्रू सँक्शन्स अ‍ॅक्ट' म्हणजे ‘कॅट्सा’ कायद्यातून सवलत देण्याची विनंती केली आहे. ‘कॅट्सा’ कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदीवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी कमी केल्याचा मुद्दाही या सिनेटर्सनी मांडला आहे. वास्तवात भारत आजही मोठ्या प्रमाणावर रशियन शस्त्रास्त्रांवर अवलंबून आहे. पण त्याचवेळी भारताने अमेरिकेकडूनही शस्त्रास्त्र खरेदी सुरु ठेवली आहे. P 8 आय बोईंग तसचं प्रडिएटर ड्रोन ही विमान भारत अमेरिकेकडून खरेदी करण्यास उत्सुक आहे.

एस-४०० किती घातक आहे?

एस-४०० ही सध्याची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ही यंत्रणा एस-३०० चे अत्याधुनिक रुप आहे. चारशे किलोमीटरपर्यतच्या परीघांत येणारी क्षेपणास्त्र आणि पाचव्या श्रेणीतील फायटर विमानं पाडण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. एस-४०० हे सुरक्षा कवचाचे काम करेल. पाकिस्तान आणि चीन यांच्या अण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रापासून भारताचे संरक्षण करण्याचे काम ही यंत्रणा करेल. ही यंत्रणा एकाचवेळी ७२ क्षेपणास्त्रांचा मारा करु शकते.

एस-४०० क्षेपणास्त्र अमेरिकेचे अत्याधुनिक लढाउ विमान जेट एफ-३५ ला देखील पाडू शकते. त्याचवेळी ३६ अण्विक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राला देखील नष्ट करु शकते. चीन, तुर्कस्थाननंतर ही यंत्रणा खरेदी करणारा भारत तिसरा देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT