Coronavirus esakal
ग्लोबल

जगभरातील 50 लाख नागरिकांना कोरोनानं गिळलं

सकाळ डिजिटल टीम

कोरोनामुळं (Coronavirus) मृत्यू झालेल्यांची संख्या सोमवारी 50 लाखांवर पोहोचलीय.

वॉशिंग्टन : कोरोनामुळं (Coronavirus) मृत्यू झालेल्यांची संख्या सोमवारी 50 लाखांवर पोहोचलीय. कोविड-19 साथीच्या रोगानं (COVID-19 Pandemic) दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत इतक्या मोठ्या संख्येनं लोकांचा बळी घेतलाय. या संसर्गजन्य रोगानं केवळ गरीब देशांतच नाही, तर आरोग्य सेवेची चांगली सुविधा असलेल्या समृद्ध राष्ट्रांमध्येही हाहाकार माजवलाय. अमेरिका (America), युरोपियन संघ (European Union), ब्रिटन (Britain) आणि ब्राझील (Brazil) या देशात कोविडमुळं मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 740,000 नागरिकांचा मृत्यू झालाय.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं मृतांची संख्या संकलित केलीय. 'पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लो'च्या म्हणण्यानुसार, 1950 पासून युद्धात जितके लोक मरण पावलेत, तितकेच लोक या महामारीमुळं मरण पावल्याचं त्यांनी नमूद केलंय. जगभरात हृदयविकारानंतर मृत्यूचं तिसरं कारण COVID-19 ला मानलं जातंय. मृतांचा हा आकडा निश्चितच कमी मानला जातोय, कारण मर्यादित संख्येत लोकांची चाचणी झालीय. विशेषतः भारतासारख्या कमी विकसित भागात या विषाणूला रोखण्यात काही प्रमाणात यश आलंय. हा विषाणू आता रशिया, युक्रेन आणि पूर्व युरोपच्या इतर भागांमध्ये पसरलाय. युक्रेनमध्ये प्रौढ लोकसंख्येपैकी केवळ 17 टक्के पूर्ण लसीकरण झालेय, तर अर्मेनियामध्ये ही संख्या सात टक्के इतकी आहे.

कोलंबिया विद्यापीठातील आयसीएपी ग्लोबल हेल्थ सेंटरचे संचालक डॉ. वफा अल सद्र म्हणाले, साथीच्या रोगामुळं उच्च उत्पन्न असलेल्या देशांना मोठा फटका बसलाय. श्रीमंत देशांचं आयुर्मान जास्त आहे, त्यामुळं लोकसंख्याही अधिक आहे. तर गरीब देशांच्या लोकसंख्येत मुलं, किशोर आणि तरुण लोकांचा वाटा जास्त आहे आणि ते कोरोना विषाणूमुळं गंभीर आजारी पडण्याची शक्यताही कमी आहे. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीला भारतात कोरोना विषाणूची प्रकरणं शिगेला पोहोचली होती. मात्र, आता देशात मृतांचा आकडा कमी नोंदवला गेलाय. हा दर रशिया, अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत कमी आहे, परंतु त्याच्या आकडेवारीबद्दल अनिश्चितता आहे. जागतिक लसीकरण मोहिमेत प्रत्येक देशानं महत्त्वाची भूमिका बजावलीय. अमेरिका आणि इतर देश त्यांच्या लोकसंख्येनुसार लसीकरण करत आहेत. तर आफ्रिकेतील लाखो लोकांना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. श्रीमंत देशांनी जगभरात लस पाठवली असली, तरी आफ्रिकेच्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ पाच टक्के नागरिकांचे लसीकरण झालेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT