america economic crisis US Debt Limit Crisis Joe Biden sakal
ग्लोबल

America Economic Crisis : अमेरिकेच्या कर्ज मर्यादेचे संकटावर लवकरच मार्ग - ज्यो बायडेन

बायडेन : आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी ५ जूनपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कर्ज मर्यादेचे संकटावर मार्ग काढण्यासाठी चर्चा शुक्रवारी (ता.२६) रात्री अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली. आर्थिक संकटामुळे अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी पाच जूनपर्यंत मुदत आहे.

अमेरिकेच्या कर्जाबाबत बायडेन सरकार आणि विरोधी रिपब्लिकन पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. रिपब्लिकन नेते केव्हिन मॅकर्थी यांच्यातील बंद दाराआड झालेली चर्चा सकारात्मक ठरली असल्याचे बायडेन यांनी सांगितले. अमेरिकेच्या सरकारवरील कर्जाची मुदत आणखी दोन वर्षे वाढविण्याचा मुद्दा चर्चेत असून कर्ज चुकते करण्याची अमेरिकेची मुदत १ जून रोजी संपणार आहे.

विनाशकारी मंदीचा धोका पूर्वीच्या अंदाजापेक्षा चार दिवस आधी उद्‍भवणार असल्याचे अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी काही महिन्यांपूर्वी लिहिलेल्या एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. अमेरिका कर्जफेड करू शकली नाही तर देशातील अर्थव्यवस्था, अमेरिकी नागरिकांच्या उपजीविकेला मोठा फटका बसू शकतो.

शिवाय जागतिक अर्थव्यवस्थाही डळमळीत होईल. गुंतवणूकदारांचा अमेरिकी डॉलरवरील विश्वास उडेल आणि यामुळे अर्थसत्ता अधिक कमकुवत होईल. नोकऱ्यांमध्ये घट होईल, व्याजदरात वाढ होऊन गृहनिर्माण क्षेत्र कोलमडेल, असा इशारा येलेन यांनी पत्रातून दिला होता.

अमेरिकेची अर्थव्यवस्थेचा तिढा सुटण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींकडे नागरिक व संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कर्जफेडीवर उपाय निघाला नाही देशातील अर्थव्यवस्थेत अराजकता निर्माण होऊन देशाच्या नेतृत्वावर जगाचा विश्वास उडण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘देशाच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी चर्चा समस्या सोडविण्याच्या टप्प्यात असून मी आशावादी आहे,’ असे बायडेन म्हणाले. यानंतर ते कँप डेव्हिड येथे ‘मेमोरियल डे’च्या कार्यक्रमासाठी निघून गेले.

आर्थिक चर्चेतील मुद्दे

  • दोन वर्षांच्या अर्थसंकल्पात कपात करणे

  • कर्जाची मुदत २०२५पर्यंत वाढविणे

  • देशाच्या खर्चात कपात करण्याची रिपब्लिकनची मागणी

  • सत्ताधारी डेमोक्रॅट्सचा खर्च कपातीला विरोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT