america 
ग्लोबल

अमेरिकेत पुन्हा गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह दहा जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

कोलोरॅडो - अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये पोलिस अधिकाऱ्यासह दहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोलोरॅडोतील सुपरमार्केटमध्ये एकाने बेछूट गोळीबार केला. यामध्ये पोलिस अधिकाऱ्यासह दहा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्याची राजधानी डेन्वरपासून 50 किमी दूर असलेल्या बोल्डर इथं ही घटना घडली असून यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस कमांडर केरी यामागुची यांनी सांगितलं की, गोळीबार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितावर उपचार सुरु आहेत. अधिकाऱ्यांनी रक्ताने माखलेल्या एका व्यक्तीला सुपरमार्केटमधून बाहेर पडताना पकडलं होतं. 

यामागुची यांनी सांगितलं की, पोलिस अजुनही प्रकरणाची चौकशी करत आहे. किंग शॉपर्स स्टोअरमध्ये गोळीबाराचा उद्देश काय होता याची माहिती घेतली जात आहे. बोल्डर काउंटीच्या डिस्ट्रिक्ट अटर्नी मायकल डोगर्टी यांनी सांगितलं की, ही एक धक्कादायक घटना असून वाईट स्वप्न आहे. आम्ही स्थानिक, राज्य आणि संघ प्रशासनाकडून आवश्यक ती मदत पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. 

गोळीबाराच्या घटनेनंतर एफबीआय तपास करत आहे. बोल्डर पोलिसांच्या विनंतीनंतर एफबीआय या प्रकरणी चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, व्हाइट हाउसचे प्रेस सचिव जेन सायकी यांनीही ट्विट करून सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना गोळीबाराची माहिती देण्यात आली आहे. घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी स्वॅट टीम दाखल झाल्या. तसंच किमान तीन हेलिकॉप्टरसुद्धा पोहोचली आहेत. असोसिएट प्रेस वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शी डीन शिलर यांनी सांगितलं की, गोळीबाराचा आवाज त्यांनी ऐकला. 

घटनेचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. यामध्ये किंग स्टोअरच्या आत एक आणि बाहेर दोघेजण दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला दोन गोळीबाराचे आवाज ऐकू आले. किंग शॉपर्स चेनने सांगितलं की, आम्हाला या घटनेबाबत वाईट वाटतं. पोलिस चौकशीदरम्यान स्टोअर बंद असणार आहे आणि तपासात सहकार्य करू.
अमेरिका अमेरिका अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : पुण्यात घरगुती सिलिंडरसाठी मोठ्या रांगा

SCROLL FOR NEXT