Moderna Sues Pfizer esakal
ग्लोबल

कोरोना लस बनवणाऱ्या मॉडर्ना कंपनीकडून Pfizer, BioNTech वर खटला दाखल

2010 आणि 2016 मध्ये एमआरएनए तंत्रज्ञानाच्या अंतर्गत मॉडर्ना कंपनीचं पेटंट होतं.

सकाळ डिजिटल टीम

2010 आणि 2016 मध्ये एमआरएनए तंत्रज्ञानाच्या अंतर्गत मॉडर्ना कंपनीचं पेटंट होतं.

वॉशिंग्टन : कोरोना लस निर्मात्या मॉडर्ना कंपनीनं (Moderna) काल शुक्रवारी फार्मास्युटिकल कंपन्या फायझर आणि बायोएनटेक यांच्यावर दावा दाखल केलाय. मॉडर्नानं प्रतिस्पर्धी कंपन्यांवर आपल्या तंत्रज्ञानाची कॉपी केल्याचा आणि कोरोना लस बनवण्यासाठी पेटंट अधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय.

2010 आणि 2016 मध्ये एमआरएनए तंत्रज्ञानाच्या अंतर्गत त्यांचं पेटंट होतं, असं मॉडर्नानं एका निवेदनात म्हटलंय. Pfizer आणि BioNTech नं स्वतःची लस बनवण्यासाठी त्यांच्या (मॉडर्ना कंपनी) तंत्रज्ञानाची कॉपी केलीय. मॅसॅच्युसेट्स-आधारित कंपनी मॉडर्नानं आपल्या शहरात असलेल्या यूएस जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केलाय. बायोएनटेक ही कंपनी असलेल्या डसेलडॉर्फ या जर्मन शहरात आणखी एक खटला दाखल केलाय.

मॉडर्नाचे प्रवक्ते ख्रिस्तोफर रिडले म्हणाले, कंपनीनं अद्याप नुकसानीचं मूल्यांकन केलेलं नाहीय. Pfizer आणि त्यांची संलग्न BioNTech नं Moderna च्या खटल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. "आम्हाला खात्री आहे की, आमची लस बौद्धिक संपदा कायद्याचं पालन करते," असं फायझरच्या प्रवक्त्या जेरिका पिट्स म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT