America President Donald Trump speaks about relations with Iran after attack 
ग्लोबल

Video : 'अण्वस्त्रे तयार केली तर बघाच!' ट्रम्प इराणवर भडकले

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेच्या एकाही सैनिकाला इजा पोचलेली नाही, असा दावा करत सध्या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाला इराणच जबाबदार आहे, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. इराणचा आक्रमकपणा कमी झाल्याचे दिसून येत असून, अमेरिकेलाही युद्ध नकोच आहे, असे ट्रम्प म्हणाले. एकूण ट्रम्प यांनी आज नरमाईचा सूर लावला. दरम्यान, अमेरिका इराणला कदापि अण्वस्त्रे तयार करू देणार नाही. तसा प्रयत्न केल्यास इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादले जातील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. 

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढलेला तणाव आणि इराणकडून मंगळवारी अमेरिकेच्या सैन्यतळावर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले. ट्रम्प म्हणाले की, इराणने केलेल्या हल्ल्यात एकाही अमेरिकी सैनिकाला इजा झालेली नाही. सर्व सैनिक सुरक्षित असून, अमेरिकेच्या सैन्यतळाची थोडी वित्त हानी झालेली आहे. 

कुठल्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आमचे सैनिक सज्ज आहेत. आधीच्या आक्रमक भूमिकेपासून इराण मागे हटल्याचे दिसत असून, ही चांगलीच बाब आहे. अमेरिकेलाही शांतताच प्रिय आहे, असे ट्रम्प म्हणाले. "व्हाइट हाउस'मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष माईक पेन्सर, संरक्षणमंत्री मार्क इस्पर आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले होते की, स्वसंरक्षणासाठी आम्ही आवश्‍यक तेवढीच पावले उचलू. तणाव वाढविण्याचा इराणचा विचार नाही; तर दुसरीकडे ट्रम्प यांनी मात्र क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरही सर्व काही ठिक असल्याचे ट्‌विट केले होते. अमेरिकेतील आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नंतर ट्रम्प यांनी पुन्हा नरमाईचा सूर लावल्याचे सांगितले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT