us election campaign trump and biden statements 
ग्लोबल

बायडेन हे आळशी भ्रष्ट, ट्रम्प हे धोकादायक व्यक्ती; प्रचारात वैयक्तिक चिखलफेक

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अध्यक्षपदाच्या निवडणुकीला काही तासच शिल्लक राहिलेले असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. विकासाचे मुद्दे बाजूला पडले असून एकमेकावर चिखलफेक करताना कोणतिही मर्यादा पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यावर गंभीर आरोप केलेले असताना प्रतिस्पर्धी उमेदवार देखील मागे राहिलेले नाहीत. त्यांनीही ट्रम्प यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या काल चार सभा झाल्या. चारही सभेत अमेरिकी अर्थव्यवस्था किंवा विकासाच्या मुद्द्याचा उल्लेख न करता त्यात त्यांनी बायडेन यांच्यावरच टीका केली. व्हिक्सॉसिन येथील सभेत ट्रम्प म्हणाले की, जर बायडेन अध्यक्ष झाले तर देशात गरीबी, नैराश्‍याचे वातावरण तयार होईल. बायडेन यांनी कामगारांचा फसवले आहे आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

मिनिसोटा येथील रॉचेस्टर येथे सभेत ७४ वर्षीय ट्रम्प म्हणाले की, बायडेन हे रागीट, आळशी आणि भ्रष्ट आहेत. त्यांचा संपूर्ण इतिहास भ्रष्टाचाराने बरबरटेला आहे. ते सत्तेचे भुकेले आहेत. सत्ता बळकावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सत्तेसाठी ते आतूर झाले आहेत. बायडेन हे विश्‍वासघातकी आहेत. ते आपल्या डोळ्यात पाहतील. नंतर ते डावीकडे, उजवीकडे बघतील आणि पाठीत खंजीर खुपसतील, अशा शब्दात त्यांनी टीका केली. सत्ता कशी मिळवायची, याचाच ते सतत विचार करत असतात, असा आरोप ट्म्प यांनी केला. बायडेन यांनी कृष्णवर्णिय लोकांचा विश्‍वासघात केला आहे. आयुष्यभर त्यांनी हेच काम केले आहे. ते कृष्णीवर्णीय युवकांचे मारेकरी आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

बायडेन यांचे ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र
माजी उपाध्यक्ष बायडेन यांनी व्हिक्सॉसिन येथील मिल्वॉकी येथे आणि आयोवा येथे डेस मोइनेसचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्रम्प यांच्यावर अनेक प्रकारचे अरोप केले आहे. ते म्हणाले की, ट्रम्प हे अमेरिकेच्या एकतेला आणि अखंडतेला धोकादायक ठरणारे व्यक्ती आहेत. त्यांनी देशात जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात देशात दंगलीने कळस गाठला आहे. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेचे राष्ट्रगीत बदलण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही त्यांनी केला.

बायडेन म्हणाले, की सरळमार्गाने काम करणाऱ्या सहा जनरल मंडळींनी ट्रम्प यांची साथ सोडली आहे. कारण ट्रम्प हे संयुक्त अमेरिकेचे प्रमुख कमांडर होण्यास पात्र नाहीत, असे या मंडळींचे म्हणणे आहे. ट्रम्प यांचा संपूर्ण कार्यकाळ हा न्यायालयातच गेला. ते निवडून आल्यानंतर न्यायालयाच्या चकरा मारत आहेत, असे बायडेन म्हणाले. ट्रम्प यांना विरोध करणाऱ्या लोकांसाठी आपण मेहनत करू, असे बायडेन यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT