vivek g ramaswamy esakal
ग्लोबल

America: राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शर्यतीतील उमेदवाराचं 'लय भारी' उत्तर; हिंदू धर्मासंबंधी होता प्रश्न

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत सहभागी असलेल्या रामास्वामींनी दिले अप्रतिम उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- भारतीय वंशाचे असलेले विवेक जी. रामास्वामी यांनी हिंदू धर्मासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर अप्रतिम उत्तर दिलंय. रामास्वामी हे अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत सहभागी असलेले उमेदवार आहेत. विचारलेल्या एका प्रश्वावर त्यांनी हिंदू असल्याबाबत समर्थन केले आहे. त्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा अमेरिकेसह भारतात होऊ लागली आहे. रामास्वामी एका कार्यक्रमात बोलत होते.

रामास्वामी यांना भारतीय वंशाचे असल्याकारणाने काही प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही हिंदू वशांचे आहात, तर अमेरिकेमध्ये बहुसंख्य लोक ख्रिश्चन आहेत. यावर रामास्वामी म्हणाले की, 'मी जो आहे तो नाही असा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार नाही. तसंही मी एक धार्मिक गुरु होण्याच्या शर्यथीत नाही. मला या देशाचा प्रमुख व्हायचं आहे.' त्यांच्या या अप्रतिम उत्तराने सर्वांचेच समाधान झाले. तसेच त्यांच्या या उत्तराची चर्चा आता भारतातही होऊ लागली आहे.

रामास्वामी म्हणाले की, एका सामान्य ख्रिश्चन माणसापेक्षा मला बायबलबाबत जास्त माहिती आहे. रामास्वामी अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतील एक उमेदवार आहेत. शुक्रवारी रात्री ते टाऊन हॉल येथे आयोजित एका लाईव्ह शोमध्ये सहभागी झाले होते. ते रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले होते की, 'देव एकच आहे. आपण सर्व विविध धर्मातून येतो, पण सर्वजण जोडले गेलो आहोत.'

रामास्वामी यांनी चीनबाबत आपली रणनीती काय असेल याबाबत स्पष्टीकरण दिलं. येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था वाढणार आहे. अशावेळी भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करुन चीनशी सामना केला जाऊ शकतो. रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि चिनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत काम करताना काय रणनीती असेल याबाबतही त्यांनी खुलासा केला. अमेरिकी हितांना प्राथमिकता देण्यात येईल, असं रामास्वामी म्हणाले. दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून तीन भारतीय वंशाच्या उमेदवारांना पुढे केले जात आहे. त्यात रामास्वामी यांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: स्वप्नपूर्तीचा आनंद ; वैभव सूर्यवंशी; भारतीय संघात निवड झाल्यानंतर युवा फलंदाज भावुक

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, अनेक भागांत २०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT